शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 11:51 IST

मायलेकांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देवाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली.एका महिलेने स्वतःच्या दोन चिमुकल्यांना विष पाजले आणि स्वतःही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

नागपूर : पती पत्नीतील वादाचा भडका उडल्यानंतर घरगुती वादातून एका महिलेने स्वतःच्या दोन चिमुकल्यांना विष पाजले आणि स्वतःही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या तिघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. 

आयेशा नसीम बेग, अमन नसीम बेग आणि हबीबा नसीब बेग अशी या घटनेतील पीडितांची नावे असून ते सध्या मेडिकलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल आहेत. आयेशाचे पती मिर्झा नसीम रहीम बेग (वय ४६) यांनी पोलिसांकडे दिलेल्या माहितीनुसार, त्याचा आणि आयेशाचा विवाह ७ वर्षांपूर्वी झाला. त्यांना सहा वर्षांचा अमन आणि११ महिन्यांची हबीबा ही दोन मुले आहेत. नसीम दूध विक्री करतो. घरी टीवी घेण्याच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून नसीम आणि आयेशा या पती-पत्नीत वाद सुरू होता. पत्नीने अनेक दिवसांपासून तगादा लावूनही आर्थिक कोंडीमुळे नसीम टीव्ही विकत आणण्यासाठी टाळाटाळ करीत होता. तीन-चार दिवसांपासून टीव्हीमुळे घरात चांगलीच आग लागली होती. या पार्श्वभूमीवर नसीम शुक्रवारी सकाळी घराबाहेर पडला. सकाळी १०.३० च्या सुमारास त्याला त्याचे शेजारी धांडे यांच्या मुलीचा फोन आला. तुमच्या पत्नीने मुलांना विष देऊन स्वतःही विष घेतले, असे तिने सांगितले. त्यामुळे नसीम घरी पोहोचला. शेजाऱ्याच्या मदतीने  दोन मोटरसायकलवर पत्नी आणि मुलांना घेऊन तो मेडिकल मध्ये पोचला. तेथे डॉक्टरांनी तिघांनाही अतिदक्षता विभागात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

 या घटनेनंतर उलट-सुलट चर्चेला उधान आले आहे. स्वतः आणि मुलांसाठी विरंगुळा म्हणून टीव्ही घेऊन देण्याचा तगादा लावूनही पती ऐकत नसल्यामुळे आयेशाने हा भयंकर टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी नसीमची तक्रार नोंदवून घेत मुलांना जीव मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली आयेशा विरुद्ध कलम ३०७,३०९, ३२८  भादवी अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.इतनिसी खुषी...!घरात मनोरंजन अथवा विरंगुळाची कसलीही सोय नसल्याने आयेशा कंटाळली होती. पती आपली एवढीशी इच्छा पूर्ण करत नसल्याची खात्री पटल्यामुळे तिला नैराश्य आले होते. त्यातून आयेशाने हा आत्मघाती निर्णय घेतला.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! १६ वर्षांच्या TikToker तरुणीची आत्महत्या; रात्री मॅनेजरशी गाण्याबद्दल बोलली, अन्...

 

धक्कादायक! हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून महिलेने मुलीला गळफास लावून स्वतःही केली आत्महत्या

 

उसन्या पैशाचा तगादा लावल्याने भाजीवाल्याची तारेने गळा आवळून हत्या 

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

 

लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

 

हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना 

 

बापरे! आई आणि  मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

Sushant singh Rajput Suicide : ... तर मुंबई पोलिसांच्या जिवाला धोका; रुपा गांगुलीने व्यक्त केली शंका

 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलnagpurनागपूर