डोक्यात पंखा मारून पत्नीची हत्या; पतीनेही केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:42 PM2018-09-08T12:42:28+5:302018-09-08T12:45:45+5:30

अकोला - पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या दाबकी या गावात एका संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात पंखा मारून तसेच तीचे डोके भिंतीवर आदळून तीची हत्या केली तर स्वत:ही गळफास लाउन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली

Wife murdered; The husband also committed suicide | डोक्यात पंखा मारून पत्नीची हत्या; पतीनेही केली आत्महत्या

डोक्यात पंखा मारून पत्नीची हत्या; पतीनेही केली आत्महत्या

Next
ठळक मुद्देगावातील सुनील मधुकर इंगळे व त्यांची पत्नी सुजाता सुनील इंगळे या दोघांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री क्षुल्लक कारणावरुन वाद झाले. सुजाता जखमी झाल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड केली असता सुनीलने तीचे डोके भिंतीवर आदळले. पत्नीच्या मृत्यूनंतर घाबरलेल्या सुनील इंगळे याने स्वता गळफास लाउन आत्महत्या केली.

अकोला - पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या दाबकी या गावात एका संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात पंखा मारून तसेच तीचे डोके भिंतीवर आदळून तीची हत्या केली तर स्वत:ही गळफास लाउन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या प्रकरणी पिंजर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवीले.
राष्ट्रीय महामार्गावरुन जवळच असलेल्या बोरगाव खुर्द गावानजीक दाबकी हे गाव आहे. या गावातील सुनील मधुकर इंगळे व त्यांची पत्नी सुजाता सुनील इंगळे या दोघांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री क्षुल्लक कारणावरुन वाद झाले. या वादातच संतापलेल्या सुनील इंगळे याने पत्नीला प्रथम पंखा फेकुन मारला, यामध्ये सुजाता जखमी झाल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड केली असता सुनीलने तीचे डोके भिंतीवर आदळले. यामध्ये भिंतीवरील खीळा सुजाताच्या डोक्यात घुसल्याने तीचा जागेवरच मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर घाबरलेल्या सुनील इंगळे याने स्वता गळफास लाउन आत्महत्या केली. शुक्रवारी राात्री घडलेल्या या घटनेनंतर शनिवारी सकाळी हा प्रकार शेजारच्यांच्या लक्षात आला. त्यांना दोघांचेही मृतदेह दिसल्याने पिंजर पोलीसांना माहिती देण्यात आली. पिंजरचे ठाणेदार नंदेकीशोर नागलकर यांच्यासह पोलीसांनी घटनास्थळावर धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा करून दोघांचेही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवीले. या प्रकरणी पतीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

 

Web Title: Wife murdered; The husband also committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.