शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी पत्नीने पतीला तडफडून मारले; चेहऱ्यावर टाकली मिरची पूड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 7:48 PM

Murder Case : या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

ठळक मुद्देया महिलेने तिच्या प्रियकरासह आणि त्याच्या मदतीने तिच्या पतीची निर्घृण हत्या केली.

भोपाळ - इंदूरमध्ये पती - पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारे प्रकरण समोर आले आहे. जिथे पत्नीने तिच्या विवाहबाह्य संबंधात अडथळा आणणाऱ्या पतीला आपल्या मार्गातून काढून टाकले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

मृत व्यक्ती कॉल सेंटरमध्ये काम करत असे

या महिलेने तिच्या प्रियकरासह आणि त्याच्या मदतीने तिच्या पतीची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आकाश मिडकिया हा इंदूर येथील एका कॉल सेंटरमध्ये कामाला होता. त्याचवेळी त्याची पत्नी वर्तिका एका खासगी रुग्णालयात काम करायची. तिचे तिचा सहकारी असलेल्या मनीष शर्मासोबत अवैध संबंध होते. जेव्हा पती आकाशला वर्तिका आणि मनीषच्या अवैध संबंधांबद्दल कळले तेव्हा तो खूप दुखावला. पतीने पत्नीला मनीषपासून दूर राहण्यास सांगितले, तेव्हा संतापलेल्या पत्नीने त्याला ठार मारण्यासाठी कट रचला. आरोपींची युक्ती चालली नाही 

१३ ऑक्टोबर रोजी झालेल्या हत्येच्या या प्रकरणात एकूण पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी वर्तिका आणि मनीष यांनी जितेंद्र वर्मा, अर्जुन मंडलोई आणि अंकित पवार यांचाही या कटात समावेश केला. आकाश बायकोला एलआयजी स्क्वेअरवर सोडल्यानंतर परतत होता. मग अर्जुन आणि अंकितने त्याला थांबवले आणि त्याच्या चेहऱ्यावर मिरचीची पूड टाकली. यानंतर त्यांनी आकाशला चाकूने भोकसले.पोलिसांनी पुढे सांगितले की, आरोपींनी पोलिसांपासून पळ काढण्यासाठी आपले केस कापले आणि दाढी देखील कापली होती. हे प्रकरण उलगडण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळापासून ९० किमीच्या अंतरावर असलेल्या १५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, त्यानंतर आरोपींना पोलिसांनी पकडले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू