पत्नीला मावस भावासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 11:40 IST2023-06-23T11:39:47+5:302023-06-23T11:40:25+5:30

Crime News : कुणालाही संशय येऊ नये म्हणून पत्नीने पोलिसांना भरकटवण्यासाठी हत्येचा आरोप दुसऱ्यावर लावला. पोलिसांनी आता या हत्येचा खुलासा केला आहे. पोलिसांनी मृतकाची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

Wife killed husband with help of new boyfriend in UP Barabaki | पत्नीला मावस भावासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं आणि मग....

पत्नीला मावस भावासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं आणि मग....

उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे पत्नीला आपल्या मावस भावासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहणं पतीला महागात पडलं. पत्नी आणि त्याच्या मावस भावाने मिळून त्याची हत्या केल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. सोबतच तिच्यावर कुणालाही संशय येऊ नये म्हणून पत्नीने पोलिसांना भरकटवण्यासाठी हत्येचा आरोप दुसऱ्यावर लावला. पोलिसांनी आता या हत्येचा खुलासा केला आहे. पोलिसांनी मृतकाची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

हजरतपूर गावातील ही घटना आहे. इथे राहणाऱ्या कैलाश नावाच्या व्यक्तीचा मृतदेह गावापासून तीन किलोमीटर अंतरावर तलावाच्या किनारी आढळून आला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना आढळलं की, कैलाशच्या गळ्यावर दुपट्टा बांधला होता आणि नाक-कानातून रक्त येत होतं. त्याच्या डोळे आणि शरीरावर जखमांच्या खूणा होत्या. 

पोलिसांना या प्रकरणात मृत  व्यक्तीची पत्नी  रेणूवर संशय आला होता. पण रेणुने पोलिसांना भरकटवण्यासाठी दुसऱ्या लोकांवर पतीच्या हत्येचा आरोप लावला. पोलिसांनी सांगितलं की, कैलाशची हत्या त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर राम कुमार यादव याने केली.

पोलिसांनी खुलासा करत सांगितलं की, मृत कैलाशच्या पत्नीचे त्याचा मावस भाऊ श्रवणसोबत अनैतिक संबंध होते. काही दिवसांआधी कैलाशने श्रवणसोबत पत्नीला  आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं. ज्यानंतर कैलाशने पत्नीला मारहाण केली.

दरम्यान, काही दिवसांनी श्रवण कामासाठी सौदी अरबमध्ये गेला. मृतकाची पत्नी यामुळे निराश होती. यादरम्यान रेणूचे अनैतिक संबंध एका शाळेतील चपराशी राम कुमारसोबत झाले. मग रेणूने पती कैलाशला मारण्याचा प्लान राम कुमारसोबत मिळून केला.

पोलिसांनी सांगितलं की, मृतकाची पत्नी रेणूने प्लान करून गेल्या 17 जून रोजी कैलाशला मुलांची फी भरण्याच्या बहाण्याने रामकुमारकडे चलण्यास सांगितलं. त्याला भेटायला गेल्यावर त्याने कोल्ड ड्रिंकमध्ये नशेचं औषध मिक्स केलं. त्यानंतर त्याला कारमध्ये बसवलं. कारमध्ये रेणु आणि रामकुमारने त्याची गळा आवळून हत्या केली. 
 

Web Title: Wife killed husband with help of new boyfriend in UP Barabaki