रात्रभर घरात केली दारूची पार्टी, सकाळी नशेत पत्नीने पतीसोबत केलं धक्कादायक कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 13:28 IST2022-12-20T13:28:10+5:302022-12-20T13:28:35+5:30
Crime News : कथितपणे आरोपी पत्नीचे तिच्या दिरासोबत अनैतिक संबंध असल्याचं समोर येत आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली असून चौकशी केली जात आहे.

रात्रभर घरात केली दारूची पार्टी, सकाळी नशेत पत्नीने पतीसोबत केलं धक्कादायक कृत्य
Shocking News: उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका पती-पत्नीने त्यांच्या नातेवाईकांसोबत घरी रात्रभर दारूची पार्टी केली. मग यादरम्यान पती-पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला, ज्यामुळे पत्नी इतकी नाराज झाली की, तिने सकाळी उठून पतीची हत्या केली. कथितपणे आरोपी पत्नीचे तिच्या दिरासोबत अनैतिक संबंध असल्याचं समोर येत आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली असून चौकशी केली जात आहे.
दारूच्या नशेत केली पतीची हत्या
ही घटना पीरपुर गावातील आहे. इथे राहणारे विनय राज आणि त्यांची पत्नी राधा यांनी नातेवाईकांसोबत मिळून रात्रभर दारूची पार्टी केली. नातेवाईकांसोबत पती-पत्नीही भरपूर दारू प्यायले. अशातच पती-पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला. पार्टी संपल्यावर नातेवाईक आपापल्या घरी गेले. पण पतीसोबतच्या वादामुळे पत्नी इतकी नाराज झाली की, सकाळी उठून तिने पतीवर धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. काही वेळाने पत्नी राधा हिनेच गावातील लोकांना या घटनेबाबत सांगितलं.
दिरासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय
मृत विनय राज लखनौमध्ये एका टेंट हाऊसमध्ये मजुरी करत होता आणि शुक्रवारी तो घरी आला होता. तेच दुसरीकडे आरोपी पत्नीचे तिच्या दिरासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. मृतकाचं लग्न साधारण 10 वर्षाआधी पत्नी राधासोबत झालं होतं. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. घटनास्थळी पोलीस आल्यावर मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून राधावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतकाची आई कांती देवी यांनी पोलिसांना सांगितलं की, सकाळी सून राधाच्या आरडाओरडमुळे एकच खळबळ उडाली होती. रूममध्ये जाऊन पाहिलं तर सगळीकडे रक्तच रक्त होतं. विनयचा मृतदेह जमिनीवर पडला होता. पोलीस चौकशी करत असून पुढील कारवाई केली जाईल.