धक्कादायक! लग्नाच्या पहिल्या रात्रीच पतीला बसला ४४० व्होल्टचा झटका, नवरी निघाली ५ महिन्यांची गर्भवती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 12:05 IST2021-12-31T12:04:33+5:302021-12-31T12:05:25+5:30

एका तरूणाचं सुखी संसाराचं स्वप्न त्याच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीच भंगलं. कारण लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याला त्याची पत्नी प्रेग्नेंट असल्याचं समजलं.

Wife found 5 months pregnant on marriage's first night in Meerut Uttar Pradesh | धक्कादायक! लग्नाच्या पहिल्या रात्रीच पतीला बसला ४४० व्होल्टचा झटका, नवरी निघाली ५ महिन्यांची गर्भवती...

धक्कादायक! लग्नाच्या पहिल्या रात्रीच पतीला बसला ४४० व्होल्टचा झटका, नवरी निघाली ५ महिन्यांची गर्भवती...

लग्न म्हटलं की, तरूण आणि तरूणी दोघेही नव्या संसाराची स्वप्न रंगवत असतात. अनेक प्रकारे आयुष्य कसं चांगलं जगता येईल याचं प्लॅनिंग करत असतात. पण एका तरूणाचं हे सुखी संसाराचं स्वप्न त्याच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीच भंगलं. त्याला लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याला समजलं की, त्याची पत्नी ५ महिन्यांची गर्भवती आहे. हे प्रकरण समोर येताच परिवारात खळबळ उडाली आहे.  तेच पती आता याप्रकरणी पोलिसात गेला आहे. 

उत्तर प्रदेशच्या मेरठमधील ही घटना आहे. पतीचा आरोप आहे की, त्याने जेव्हा पत्नी प्रेग्नेंट असल्याची बातमी सासरच्या लोकांना सांगितली तेव्हा सासरच्या लोकांनी उलट त्यालाच खोट्या केसमध्ये फसवण्याची धमकी दिली. इतकंच नाही तर त्याच्याकडून आता १० लाख रूपयांची मागणीही करत आहे. 

आता नवविवाहित तरूण न्यायासाठी मेरठ एसएसपी ऑफिसमध्ये पोहोचला. इथे त्याने लिखित तक्रार देत पोलिसांकडे याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. तेच त्याच्या वडिलांनी सांगितलं की, लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरी त्यांच्या मुलाला म्हणाली होती की, तिच्या पोटात दुखत आहे. पण त्यावेळी हे कुणाच्या लक्षात आलं नाही.

पण जेव्हा पतीला संशय आला तेव्हा त्याने याबाबत त्याच्या आईला सांगितलं. त्यानंतर तो पत्नीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. इथे तिचा अल्ट्रासाउंड रिपोर्ट पाहिल्यावर पती आणि त्याच्या घरातील लोकांच्या पायाखालची जमिनीच सरकली.

अल्ट्रासाउंड रिपोर्टमध्ये पत्नी ५ महिन्यांची प्रेग्नेंट असल्याचं समजलं आणि समोर आलं की, तिच्या पोटात जुळे बाळ आहेत. पण महिलेच्या घरच्या लोकांनी हे मान्य करण्यास नकार दिला आणि उलट तरूणालाच फसवण्याची धमकी दिली गेली. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
 

Web Title: Wife found 5 months pregnant on marriage's first night in Meerut Uttar Pradesh