खळबळजनक! पत्नीने आधी केली पतीची हत्या, नंतर प्रायव्हेट पार्ट कापून पॅनवर शिजवला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 14:39 IST2021-06-10T14:39:35+5:302021-06-10T14:39:44+5:30

पती-पत्नीमध्ये भांडण सुरू होतं. तेव्हाच महिला हिंसक झाली आणि तिने पतीची हत्या केली. यानंतर आरोपीने आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट कापून तो पॅनमध्ये शिजवला. 

Wife cooks her husbands private part after killing him in brazil | खळबळजनक! पत्नीने आधी केली पतीची हत्या, नंतर प्रायव्हेट पार्ट कापून पॅनवर शिजवला...

खळबळजनक! पत्नीने आधी केली पतीची हत्या, नंतर प्रायव्हेट पार्ट कापून पॅनवर शिजवला...

ब्राझीलमधून पती-पत्नीच्या भांडणानंतर झालेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने आपल्या पतीची हत्या केली आणि त्यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्ट कापून तो शिजवला. पोलिसांनी ३३ वर्षीय आरोपी महिला दयाने क्रिस्टीना रोड्रीग्स मचाडोला अटक केली आहे. साओ गोंकालो पोलिसांनी सांगितले की, पती-पत्नीमध्ये भांडण सुरू होतं. तेव्हाच महिला हिंसक झाली आणि तिने पतीची हत्या केली. यानंतर आरोपीने आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट कापून तो पॅनमध्ये शिजवला. 

‘डेली मेल’ ने दिलेल्या  वृत्तानुसार, मृतकाचं नाव आंद्रे आहे. पोलिसांना आंद्रेच्या शेजाऱ्यांनी या घटनेबाबत माहिती दिली होती. जेव्हा पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले, ते समोर जे दिसलं ते पाहून ते हैराण झाले. रूममध्ये आंद्रेचा मृतदेह, नग्न आणि रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रूममधील दृश्य फारच भयावह होतं. पोलिसांना मृतकाचा प्रायव्हेट पार्ट फ्राइंग पॅनमध्ये शिजताना दिसला होता. (हे पण वाचा : धक्कादायक! सावत्र आईने जाळला १० वर्षाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्ट, कारण वाचून हैराण व्हाल)

पोलिसांनुसार ही घटना ७ जूनला सकाळी ४ वाजता घडली. कपलमध्ये वेगळे होण्यावरून वाद सुरू होता. पोलिसांनी घटनास्थळावरून भाजी चिरण्यासाठीचा चाकू ताब्यात घेतला.  त्यांनी सांगितलं की, याच चाकूने महिलेने पतीची हत्या केली. महिलेला हत्या आणि मृतदेह अपवित्र करण्याच्या आरोपात अटक केली गेली.

वेगळं राहत होतं कपल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे कपल गेल्या १० वर्षांपासून एकत्र होतं. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद वाढला होता.  ज्यामुळे दोघांनीही वेगवेगळं राहण्यास सुरूवात केली होती. तरी दोघे कधी कधी भेटत होते. त्यांना एक आठ वर्षाचा मुलगा आणि एक पाच वर्षांची मुलगी आहे. हे अजून स्पष्ट होऊ शकलं नाही की, या घटनेवेळी मुले कुठे होते. पती-पत्नी एक पिझ्झा शॉप चालवत होते.

हत्येआधी नशा

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, हत्येच्या रात्री कपल एका बारमध्ये गेलं होतं. तिथे त्यांनी नशा केली. त्यानंतर दोघांमध्ये वेगळे होण्यावरून भांडण झालं. महिलेच्या वकिलाने दावा केला की, तिचा पती आंद्रेने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ज्यानंतर पत्नीने स्वत:ची रक्षा करण्यासाठी त्याला मारलं. तेच आंद्रेची बहीण एड्रियाना सॅंटोस म्हणाली की, महिलेनेच तिच्या भावाची हत्या केली आहे. कारण तिला वाटत होतं की आंद्रे तिला दगा देत आहे. 

Web Title: Wife cooks her husbands private part after killing him in brazil