पत्नीला बेडरुममध्ये बॉयफ्रेंडसोबत पाहिले पतीने अन् तिने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 19:41 IST2019-10-04T16:20:22+5:302019-10-04T19:41:14+5:30
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळी उडाली आहे.

पत्नीला बेडरुममध्ये बॉयफ्रेंडसोबत पाहिले पतीने अन् तिने केली आत्महत्या
उत्तर प्रदेश - परक्या पुरुषासोबत बेडरुममध्ये पतीनं पाहिल्यानं महिलेनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथे घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदानासाठी रुग्णालयात पाठवून दिला आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळी उडाली आहे.
बेडरुममध्ये परक्या पुरूषासोबत पत्नीला पाहिल्यानंतर पतीला धक्काच बसला. त्यानंतर महिला आणि तिच्या पतीमध्ये त्यावेळी मोठा वाद झाला. वादानंतर खजील झालेल्या महिलेनं बंद खोलीत स्वत:ला गळफास लावून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आणि आत्महत्या केली. पती आणि पत्नीत दोघांमध्ये दररोज वाद होत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महिला नाराज होती आणि त्य़ातूनच हा प्रकार घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरी मस्जिद निवास इथे राहणाऱ्या महिलेचे अनैतिक संबंध शेजारी राहणाऱ्या महेशसोबत होते. पतीच्या गैरहजेरीत महेशचे घरी वरचेवर येणं - जाणं सुरु होतं. त्यानंतर दोघांनी घरी कोणी नसल्याचा अंदाज घेऊन महिलेच्या घरी भेटायचे ठरविले. अचानक घरी आलेल्या पतीनं त्यांना बेडरूममध्ये विवस्त्र अवस्थेत पाहिलं आणि पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची पोलखोल झाली. दरम्यान, महिलेला अशा अवस्थेत पाहून पतीचा रागाचा पारा चढला आणि तिथेच दोघांच भांडण झालं. या भांडणानंतर महिलेनं गळपास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.