दारुसाठी मुलाचं पैंजन मोडल्यानं पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; सोलापूरमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 13:55 IST2022-02-04T13:52:47+5:302022-02-04T13:55:02+5:30
पोलीस सूत्रांनुसार मयत प्रतिमा हिचा सात वर्षांपूर्वी सांगोला येथील सोमनाथ अशोक बदडे यांच्याशी विवाह झाला होता.

दारुसाठी मुलाचं पैंजन मोडल्यानं पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; सोलापूरमधील धक्कादायक घटना
दारुसाठी पतीने मुलाच्या पायातील पैंजन मोडल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यातून टोकाचे पाऊल उचलत प्रतिमा बदडे यांनी बुधवारी रात्री ८.३०च्या सुमारास प्रतिमा हिने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सासू सुनीता अशोक बदडे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी मुलगी सपना बाळू ढोबळे हिच्या मदतीने सून प्रतिमा हिस खाली उतरवून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासून ती मयत झाल्याचे सांगितले.
प्रतिमा सोमनाथ बदडे (२७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत प्रवीण बाळासाहेब मायणे (रा. लहुजी वस्तादनगर, टाकळी रोड, पंढरपूर) यांनी पोलिसात खबर दिली. पोलीस सूत्रांनुसार मयत प्रतिमा हिचा सात वर्षांपूर्वी सांगोला येथील सोमनाथ अशोक बदडे यांच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर या दांपत्याला एक मुलगा, एक मुलगी आहे.