शेजाऱ्याच्या बेडरुममध्ये पत्नीला पाहून भडकला पती अन् संतापात उचललं धक्कादायक पाऊल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 14:20 IST2022-09-24T14:19:39+5:302022-09-24T14:20:04+5:30

एक व्यक्ती आपल्या पत्नीला परपुरुषासोबत पाहून संतापला आणि रागाच्या भरात पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

wife caught red handed by husband in neighbors bedroom pati patni aur woh | शेजाऱ्याच्या बेडरुममध्ये पत्नीला पाहून भडकला पती अन् संतापात उचललं धक्कादायक पाऊल...

शेजाऱ्याच्या बेडरुममध्ये पत्नीला पाहून भडकला पती अन् संतापात उचललं धक्कादायक पाऊल...

एक व्यक्ती आपल्या पत्नीला परपुरुषासोबत पाहून संतापला आणि रागाच्या भरात पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. पतीनं इतकं मारलं की पत्नी रक्तबंबाळ झाली. यानंतर पत्नीनं थेट कोर्टाची पायची चढली. ज्यात कोर्टानं आता पत्नीला नुकसान भरपाई स्वरुपात ५० हजार रुपये देण्याचे आदेश पतीला दिले आहेत.

'द मिरर'च्या वृत्तानुसार ही घटना ब्रिटनच्या वॉरिंगटन येथील आहे. ४२ वर्षाच्या जेसन हीथकोट याला आपल्या पत्नीवर संशय होता. एका रात्री जेव्हा त्याची ४० वर्षीय पत्नी केरी घरातून बाहेर पडली तेव्हा जेसननं तिचा पाठलाग केला. केरी आपल्याच शेजाऱ्याच्या घरात जात असल्याचं जेसननं पाहिलं. 

शेजाऱ्याच्या दाराबाहेरच जेसन वाट पाहात उभा राहिला. त्यानंतर जेसन देखील शेजाऱ्याच्या घरात शिरला. पत्नीचा शोध घेण्यास सुरुवात केली पण ती सापडली नाही. शेजारी देखील केरी इथं आलीच नाही असा दावा करू लागला. पण जेसननं स्वत:च्या डोळ्यांनी केरीला त्याच्या घरात जाताना पाहिलं होतं. जेसननं घराचा प्रत्येक कोपरा शोधला. अखेरच बेडच्या खाली केरी लपून बसल्याचं जेननं पाहिलं. केरीला पाहून जेसनला राग अनावर झाला आणि त्यानं पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. 

जेसननं जबर मारहाण केली. यात शेजारील व्यक्ती देखील त्याला थांबवण्यासाठी मधे पडला तर त्यालाही जेसननं मारहाण केली. केरी गंभीररित्या जखमी झाला. तिच्या नाकातून रक्त वाहू लागलं होतं आणि चेहरा सूजला होता. 

पत्नीनं पतीविरोधात घेतली कोर्टात धाव
जेसननच्या जीवघेण्या हल्ल्यानंतर केरीनं कोर्टात याचिका दाखल केली. केरीनं पती जेसन याच्यावर जीवे मारण्याचा आरोप करत त्याला कोर्टात खेचलं. आता केरीनं पती जेसन सोबतचे सर्व संबंध तोडले आहेत. जूनमध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी कोर्टानं जेसनला नुकसान भरपाईचे आदेश दिले. तसंच एका वर्षाची शिक्षा देखील सुनावली आहे. 

 

Web Title: wife caught red handed by husband in neighbors bedroom pati patni aur woh