शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! ३१ लाख खर्च करून पत्नीला कॅनडाला पाठवलं, पोहचल्यावर म्हणाली - 'फोन केला तर केस करेन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 14:28 IST

फसवणुकीच्या या प्रकरणात तरूणाने पत्नी, सासू, सासरे, मुलीचे मामा, मामी, मामे बहीण विरोधात केस दाखल केली आहे.

पंजाबच्या मोगामधील एका तरूणाने त्याच्या पत्नीला कॅनडाला पाठवण्यासाठी ३१ लाख रूपये खर्च केले. तरूणी लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कॅनडाला गेली सुद्धा. पण कॅनडाला पोहोचताच तिचा रंग बदलला. दहा दिवसांनी जेव्हा पतीने तिला फोन केला तर त्याला ती म्हणाली की, तिला परत फोन केला तर ती त्याच्याविरोधात केस करेल. फसवणुकीच्या या प्रकरणात तरूणाने पत्नी, सासू, सासरे, मुलीचे मामा, मामी, मामे बहीण विरोधात केस दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणी पीडित तरूणाने मोगातील पोलीस स्टेशनमध्ये ११ मार्च २०२० ला लिखित तक्रार दिली होती. पोलिसांनी घटनेच्या तब्बल ११ महिन्यांनंतर एफआयआर दाखल केला आहे. उशीरा केस दाखल झाल्याने आरोपींना पोलीस पकडू शकले नाही. पत्नी सोडून सर्व आरोपी देशातच आहेत. पोलीस अधिकारी प्रीतम सिंह म्हणाले की, दविंदर सिंह याच लग्न लुधियानातील मंडियानी गावातील हरजशनप्रीत कौरसोबत ऑगस्ट २०१८ मध्ये झालं होतं. (हे पण वाचा : बॉयफ्रेन्डच्या मदतीने पतीला जिवंत जाळलं, मित्रानेच फोन करून विटांच्या भट्टीवर बोलवलं होतं...)

देण्यात आलेल्या तक्रारीत सांगण्यात आले आहे की, मावशी-काकाजींनी त्यांच्या गावातील हरजशनप्रीत कौरबाबत सांगितलं होतं. ती आयलेट्स पास झाली होती आणि तिला पुढील शिक्षणासाठी परदेशात जायचं होतं. जर त्याने लग्न केलं तर त्यानेही परदेशात सेटल व्हावं. त्याला लग्नापासून ते परदेशात पाठवण्याचा खर्च उचलावा लागेल. देविंदरने लग्नापासून ते पत्नीला कॅनडाला पाठवण्यासाठी एकूण ३१ लाख रूपये खर्च केले.(हे पण वाचा : खरी ओळख लपवून ३१ वर्षीय महिलेचं १४ महिने लैंगिक शोषण, २३ वर्षीय आरोपीला अटक...)

देविंदर म्हणाला की पत्नीला फोन केल्यावर जेव्हा तो सासरी गेला तेव्हा तिथेही त्याच्यासोबत चांगला व्यवहार करण्यात आला नाही. याप्रकरणी पोलिसांनी ११ महिन्यांनंतर हरजशनप्रीत कौर, तिचे वडील सुखविंदर सिंह, हरप्रीत कौर, हरजीत सिंह सर्बजीत कौर आणि अमनजोत कौर यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPunjabपंजाबmarriageलग्नCanadaकॅनडा