प्रियकराला कॉल करून महिलेने बनवला स्वत:चा अश्लील व्हिडीओ, त्यावरून तिने पतीला केलं ब्लॅकमेल....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 03:56 PM2022-06-07T15:56:34+5:302022-06-07T15:57:13+5:30

Bihar : पत्नीने स्वत:चा अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि पतीकडूनच दीड लाख रूपये हडप केले. झालं असं की, पत्नीने प्रियकराला व्हिडीओ कॉल व हा कॉल रेकॉर्ड केला.

Wife blackmail husband illicit relation obscene videos viral police Munger Bihar | प्रियकराला कॉल करून महिलेने बनवला स्वत:चा अश्लील व्हिडीओ, त्यावरून तिने पतीला केलं ब्लॅकमेल....

प्रियकराला कॉल करून महिलेने बनवला स्वत:चा अश्लील व्हिडीओ, त्यावरून तिने पतीला केलं ब्लॅकमेल....

Next

बिहारच्या (Bihar) मुंगेरमधून पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक खळबळजनक  घटना समोर आली आहे. यात पत्नीनेच व्हिलन बनून पतीविरोधात असं काही षडयंत्र रचलं की, ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. ही घटना मुंगेरच्या जमातपूर भागातील आहे. महिलेने प्रियकरासोबत प्लान केला आणि पतीला ब्लॅकमेल करू लागली.

पत्नीने स्वत:चा अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि पतीकडूनच दीड लाख रूपये हडप केले. झालं असं की, पत्नीने प्रियकराला व्हिडीओ कॉल व हा कॉल रेकॉर्ड केला. महिलेने आक्षेपार्ह स्थितीतील आपला  व्हिडीओ पतीला पाठवला. पत्नी पतीला म्हणाली की, ती एका सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकली आहे आणि व्हिडीओ कॉल दरम्यान तिचा अश्लील व्हिडीओ बनला. ती पतीला म्हणाली, मला यातून वाचवा.

पत्नीने पतीला सांगितलं की, दीड लाख रूपये घेतल्यावरच तो व्हिडीओ डिलीट करेल. पतीने कुठूनतरी दीड लाख रूपये आणले आणि पत्नीकडे दिले. याच्या काही दिवसांनंतर प्रियकराच्या सांगण्यावरून महिलेने पतीकडे पुन्हा 50 हजार रूपयांची मागणी केली. पण पतीने तिला पैसे देण्यास नकार दिला. ज्यानंतर पत्नीने सांगितलं की, हे माझंच कृत्य होतं. तुझ्याकडून पैसे काढण्यासाठी मी हा खेळ रचला होता. कुणीही सायबर गुन्हेगार नाहीये. तो माझा प्रियकर आहे'.

हे ऐकून पती हैराण झाला आणि आता न्यायाची मागणी करत आहे. असं सांगितलं जात आहे की, हवेली खडगपूरच्या व्यक्तीचं लग्न 2019 मध्ये जमालपूरमध्ये राहणाऱ्या तरूणीसोबत झालं होतं. लग्नानंतर तरूणीचं अफेअर सुरू झालं. पीडित पती पटणा येथे राहून काम करतो. दोघांना अडीच वर्षाचा मुलगा आहे.  पीडित व्यक्तीने पोलिसात तक्रार दिली आणि न्यायाची मागणी केली आहे.

Web Title: Wife blackmail husband illicit relation obscene videos viral police Munger Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.