धक्कादायक! पतीनं पोलीस ठाण्याच्या परिसरातच कापला पत्नीचा गळा; घटनेनं एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 10:43 AM2021-08-28T10:43:06+5:302021-08-28T10:44:44+5:30

पतीला पोलिसांकडून अटक; पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू

wife attacked by husband in police station premises in bihar | धक्कादायक! पतीनं पोलीस ठाण्याच्या परिसरातच कापला पत्नीचा गळा; घटनेनं एकच खळबळ

धक्कादायक! पतीनं पोलीस ठाण्याच्या परिसरातच कापला पत्नीचा गळा; घटनेनं एकच खळबळ

Next

पाटणा: बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात धक्कादायक घटना घडली आहे. संतापलेल्या पतीनं पोलीस ठाण्यातच पत्नीचा गळा कापला. त्यामुळे एकच खळबळ माजली. जखमी महिलेला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आरोपी पतीला अटक करण्यात आली. महुआ पोलीस ठाण्यात ही घटना घडली.

पती सतत भांडत असल्यानं २८ वर्षांची शबनम माहेरी निघून गेली. तिला परत आणण्यासाठी तिचा पती सोनू रानीपोखरला पोहोचला. शबनम आणि सोनू यांचं भांडण मिटावं, समेट घडावा यासाठी शबनमच्या पालकांनी दोघांना पोलीस ठाण्यात नेलं. पोलीस कारवाई होत असताना सोनू संतापला. पोलीस ठाण्याच्या परिसरातच त्यानं तिचा गळा कापण्याचा प्रयत्न केला.

शबनमच्या कुटुंबीयांनी सोनूला पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी सोनूला तुरुंगात टाकलं. शबनमला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शबनमच्या भावानं सोनूविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

शबनम महादेव मठ, तर सोनू बकसामाचा रहिवासी असल्याची माहिती महुआ पोलीस ठाण्याचे एसएचओ कृष्णनंद झा यांनी दिली. 'पती-पत्नीमध्ये सतत वाद व्हायचे. त्यामुळे मुलीकडचे दोघांना पोलीस ठाण्यात घेऊन आले. तुमच्यावर केस करून बाँड तयार करू, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे संतापलेल्या सोनूनं पोलीस ठाण्याच्या गेटजवळ पत्नीवर वार केले,' अशी माहिती झा यांनी दिली.

Web Title: wife attacked by husband in police station premises in bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.