विधवा भावजयीवर दिराचा बाथरुमध्ये बलात्कार; जळगावमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 20:28 IST2021-02-04T20:15:24+5:302021-02-04T20:28:18+5:30

हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला जीवंत ठेवणार नाही, अशीही त्याने धमकी दिल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

A widow has been raped in Jalgaon | विधवा भावजयीवर दिराचा बाथरुमध्ये बलात्कार; जळगावमधील धक्कादायक प्रकार

विधवा भावजयीवर दिराचा बाथरुमध्ये बलात्कार; जळगावमधील धक्कादायक प्रकार

जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला असलेल्या दिराने ३५ वर्षीय विधवा भावजयीवर मध्यरात्री बलात्कार केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशविताविरुध्द गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी त्याला फुले मार्केट परिसरातून अटक केली. पीडिता ही सासु, सासरे, मुले व दिरासह एकत्र राहते. पतीचे एक वर्षापूर्वीच निधन झाले आहे.

बुधवारी मध्यरात्री पीडिता लघुशंकेसाठी उठली असता दिराने ही संधी साधून तू मला खूप आवडतेस, असे म्हणत शरीरसुखाची मागणी करुन पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यास विरोध केला असता त्याने पीडितेला बाहेर आणून बाथरुमध्ये बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशीही त्याने धमकी दिल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, घाबरलेल्या पीडितेने भीतीनेच रात्र काढली. सकाळी उठल्यावर बहिण व इतरांना माहिती देऊन थेट एमआयडीसी पोलीस गाठले. महिला उपनिरीक्षक कांचन काळे यांनी पीडितेचा जबाब नोंदविला. दरम्यान, गुन्हा दाखल होताच सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी संशयिताची माहिती काढली असता तो फुले मार्केटमध्ये कपडे विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, विजय बाविस्कर, सचिन चौधरी व सचिन पाटील यांच्या पथकाने ताब्यात घेतले.

Web Title: A widow has been raped in Jalgaon