जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 22:30 IST2025-08-29T22:27:28+5:302025-08-29T22:30:58+5:30

विपिन कुमार मिश्रा आणि भारती देवी सैनी यांचा १३ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना कनक ही मुलगी आणि श्लोक हा मुलगा अशी दोन मुले आहेत.

Why didn't you cook vegetables for dinner? The husband asked his wife angrily; the angry wife took the extreme step! | जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!

जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!

उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पतीसोबत झालेल्या वादानंतर गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सेनपश्चिम पारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू आहे.

विपिन कुमार मिश्रा आणि भारती देवी सैनी यांचा १३ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना कनक ही मुलगी आणि श्लोक हा मुलगा अशी दोन मुले आहेत.

नेमके काय घडले?
भारती देवीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री भाजी न बनवण्यावरून पती विपिन आणि भारती यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की दोघेही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपायला गेले. याच तणावात भारती यांनी गळफास लावून आपले जीवन संपवले.

या घटनेची माहिती मिळताच सेनपश्चिम पारा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह पंख्यावरून खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा केले आहेत.

कुटुंबीयांची पोलिसांकडे तक्रार नाही
या प्रकरणी महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे कोणतीही तक्रार केलेली नाही. भारतीच्या कुटुंबीयांनी दु:ख व्यक्त करताना म्हटले की, "पती-पत्नीमध्ये असे छोटे-छोटे वाद होतच असतात, पण आमच्या मुलीने इतका मोठा निर्णय का घेतला, हे कळत नाही. तिने किमान आपल्या मुलांचा तरी विचार करायला हवा होता."

या प्रकरणी सेनपश्चिम पोलीस ठाण्याचे प्रभारी कुशल पाल यांनी सांगितले की, "आम्हाला महिलेने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली होती. मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात असून, यामागे पती-पत्नीमधील किरकोळ वाद हे कारण असल्याचे समोर आले आहे. मृतकाच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. तक्रार आल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल."

Web Title: Why didn't you cook vegetables for dinner? The husband asked his wife angrily; the angry wife took the extreme step!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.