Anil Deshmukh Arrest: अनिल देशमुखांनी वसुलीचा पैसा नेमका ठेवला कुठे? ईडीला वेगळाच संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 07:00 AM2021-11-04T07:00:53+5:302021-11-04T07:01:37+5:30

अनिल देशमुखांशी संबंधित २७ कंपन्यांचा ईडीकडून तपास सुरु. देशमुख यांचा या कंपन्यांशी थेट संबंध नसला, तरी त्यांच्यामुळे या कंपन्यांत आर्थिक गुंतवणूक झाली आहे.

Where exactly did Anil Deshmukh keep the recovery money? ED investigation start | Anil Deshmukh Arrest: अनिल देशमुखांनी वसुलीचा पैसा नेमका ठेवला कुठे? ईडीला वेगळाच संशय

Anil Deshmukh Arrest: अनिल देशमुखांनी वसुलीचा पैसा नेमका ठेवला कुठे? ईडीला वेगळाच संशय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शंभर कोटींच्या वसुलीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या विविध २७ कंपन्या असून, वसुलीतील रक्कम हवालामार्फत त्यात वळविल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना आहे. 
यातील कंपन्या बहुतांश शेल असून, काळा पैसा व्यवहारात आणण्यासाठी त्यांचा वापर केल्याचे गृहीत धरून तपास सुरू आहे. 

देशमुख यांचा या कंपन्यांशी थेट संबंध नसला, तरी त्यांच्यामुळे या कंपन्यांत आर्थिक गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे या आर्थिक व्यवहारांची माहिती त्यांच्याकडून मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे १३ आणि नातेवाईक, तसेच जवळच्या मित्रांच्या नावे १४ कंपन्या आहेत. मात्र, अनेक कंपन्यांमध्ये काहीही व्यवसाय नाही. मात्र, त्यांचे अस्तित्व दाखवून काळा पैसा व्यवहारात आणल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे.

विरोधात नवे पुरावे नाहीत : परमबीर सिंग
मी माझी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे दिलेली आहे. आता त्यासंदर्भात मला आणखी काही पुरावे द्यायचे नाहीत, तसेच उलटतपासणीही करायची नाही, असे आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी न्या. चांदीवाल यांना २२ ऑक्टोबरच्या सुनावणीत लेखी कळविले होते. त्यामुळे मला आयोगासमोर साक्षीसाठी गैरहजर राहण्याची मुभा द्यावी, असे सिंग यांनी म्हटले होते. 
आयोगाने यापूर्वी सिंग यांना सातत्याने साक्षीसाठी समन्स बजावले होते. हजर न राहिल्याबद्दल दंडही ठोठावला होता. त्यामुळे याबाबत आता चांदीवाल आयोग कोणती भूमिका घेतो, यावर राज्य सरकारने सुरू केलेल्या या चौकशीचे भवितव्य ठरणार आहे.

दोन चौकशा वेगवेगळ्या
चांदीवाल आयोगाच्या चौकशीसोबतच अनिल देशमुख यांची ईडी आणि सीबीआय या केंद्रीय संस्थांमार्फत स्वतंत्रपणे चौकशी सुरू झालेली आहे. त्यातील एका प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली असून, ते सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. त्या अटकेचा आणि चांदीवाल आयोगाच्या चौकशीचा एकमेकांशी संबंध नसल्याचे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांनी सांगितले.

 

Web Title: Where exactly did Anil Deshmukh keep the recovery money? ED investigation start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.