तिला नातं संपवायचं होतं पण...प्रियकराने संतापून आई आणि भावासमोर प्रेयसीवर गोळ्या झाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 09:27 IST2025-09-01T09:17:20+5:302025-09-01T09:27:53+5:30

पश्चिम बंगालमध्ये १९ वर्षीय मुलीची तिच्या माजी प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केली.

When the girl broke off the relationship the young man shot her in front of the family | तिला नातं संपवायचं होतं पण...प्रियकराने संतापून आई आणि भावासमोर प्रेयसीवर गोळ्या झाडल्या

तिला नातं संपवायचं होतं पण...प्रियकराने संतापून आई आणि भावासमोर प्रेयसीवर गोळ्या झाडल्या

West Bengal Crime: पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात झालेल्या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. नादिया जिल्ह्यातील कृष्णनगर भागात एका मुलीवर तिच्या माजी प्रियकराने गोळ्या झाडल्या. आरोपी मुलगा आणि मुलगी एकत्र शिक्षण घेत होते. या काळात दोघांचेही प्रेमसंबंध होते. गेल्या काही दिवसांपासून मुलीला मुलासोबतचे नाते संपवायचे होते. संतप्त झालेल्या मुलाने तिच्या घरी पोहोचून तिच्या कुटुंबीयांसमोर मुलीवर गोळ्या झाडल्या आणि पळून गेला.

गेल्या सोमवारी दुपारी २ ते २:३० च्या दरम्यान, १९ वर्षीय किशोरी ईशा मलिक हिची तिच्या प्रियकराने घरात गोळ्या घालून हत्या केली. ईशाला प्रेमसंबंध संपवायचे होते, त्यामुळे आरोपीने हे पाऊल उचलले आणि घटनास्थळावरून पळून गेला. ही घटना माणिकपाडा परिसरात घडली जो कृष्णनगर महिला महाविद्यालयासमोर आहे. ईशा घरी होती आणि त्याच वेळी आरोपी प्रियकर देबराज सिंघा आला आणि त्याने अगदी जवळून गोळी झाडली. त्यापैकी एक गोळी ईशाच्या डोक्यात लागली आणि ती रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली.

घटनेच्या वेळी ईशाची आई आणि धाकटा भाऊ घरात होते. ईशाच्या आईने सांगितले की तिला अचानक मोठा आवाज ऐकू आला. ती खोलीकडे धावत गेली तेव्हा तिला एक तरुण शस्त्र घेऊन पळत असल्याचे आणि तिची मुलगी रक्ताने माखलेली जमिनीवर पडलेली दिसली. कुटुंबीयांनी तातडीने ईशाला शक्तीनगर जिल्हा रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशाच्या शरीरावर दोन गोळ्या लागल्या असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

ईशा आणि आरोपी देबराजचे शालेय जीवनापासूनच प्रेमसंबंध होते. ईशाने २०२३ मध्ये शाळा सोडली होती. नादिया जिल्ह्यातील मोहनपूर येथील बिधान चंद्र कृषी विद्यापीठाजवळ राहणारा आरोपी हा पीडितेच्या भावाचा ओळखीचा होता. म्हणूनच तो अनेकदा घरी येत असे. सध्या आरोपी फरार असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. ही संपूर्ण घटना ईशाच्या कुटुंबासमोर घडली, ज्यामुळे तिची आई आणि भाऊ हादरून गेले आहेत. या घटनेबाबत परिसरात संताप आणि दहशतीचे वातावरण आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: When the girl broke off the relationship the young man shot her in front of the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.