सायबर गुन्हेगारांनी आता लोकांची फसवणूक करण्यासाठी एक नवीन आणि धोकादायक शक्कल लढवली आहे. दिल्लीतील एका तरुणाला व्हॉट्सॲपवर आलेली 'फेक ट्रॅफिक चलन'ची लिंक ओपन करणे चांगलेच महागात पडले. या एका क्लिकमुळे केवळ काही मिनिटांतच त्याच्या बँक खात्यातून ४ लाख रुपये लंपास करण्यात आले आहेत.
पीडित तरुणाला त्याच्या व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला होता, ज्यामध्ये त्याने रहदारीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगण्यात आले होते. मेसेजसोबत एक लिंक दिली होती आणि त्यावर क्लिक करून 'चलन' भरण्यास सांगण्यात आले होते.
ही लिंक हुबेहूब अधिकृत सरकारी वेबसाइटसारखी दिसत होती. तरुणाने त्या लिंकवर क्लिक करून आपली माहिती भरली, तसे त्याचे फोनचे नियंत्रण हॅकर्सकडे गेले किंवा त्याच्या बँक डिटेल्सची चोरी झाली. काही वेळातच त्याच्या मोबाईलवर एकामागून एक मेसेज येऊ लागले आणि पाहता पाहता ४ लाख रुपये खात्यातून गायब झाले.
अशा फसवणुकीपासून स्वतःला कसे वाचवाल?१. अधिकृत वेबसाइट तपासा: ट्रॅफिक चलनचे मेसेज सहसा व्हॉट्सॲपवर येत नाहीत. नेहमी अधिकृत 'e-Challan' वेबसाइट किंवा 'mParivahan' ॲपवर जाऊन खात्री करा. २. अनोळखी लिंक टाळा: व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे आलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका, मग ती बँक, रिवॉर्ड किंवा चलनाशी संबंधित असली तरीही. ३. मोबाईल नंबर तपासा: सरकारी मेसेज हे सहसा विशिष्ट कोड (उदा. AD-TRAFIC) मधून येतात, वैयक्तिक मोबाईल नंबरवरून नाही. ४. ॲप्सना परवानगी देऊ नका: कोणत्याही अनोळखी लिंकवरून एपीके (APK) फाईल डाऊनलोड करू नका.
फसवणूक झाल्यास काय करावे?जर तुमची अशी फसवणूक झाली, तर तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइनवर फोन करा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
Web Summary : Delhi youth lost ₹4 lakh after clicking a fake traffic challan link on WhatsApp. Cybercriminals are using this method. Verify challans on official websites or mParivahan app. Report fraud immediately to cybercrime helpline 1930.
Web Summary : दिल्ली के युवक को व्हाट्सएप पर फर्जी ट्रैफिक चालान लिंक क्लिक करने पर ₹4 लाख का नुकसान हुआ। साइबर अपराधी इस तरीके का इस्तेमाल कर रहे हैं। आधिकारिक वेबसाइटों या एमपरिवहन ऐप पर चालान सत्यापित करें। साइबर अपराध हेल्पलाइन 1930 पर तुरंत धोखाधड़ी की रिपोर्ट करें।