शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

बाबो! व्हॉट्सअपवरून नवरा गे असल्याचं माहिती पडलं; पत्नीने थेट पोलीस स्टेशन गाठलं

By पूनम अपराज | Published: November 16, 2020 8:18 PM

Fraud Marriage : मिळालेल्या माहितीनुसार सुरतच्या गोपीपुरा भागात राहणाऱ्या एका महिलेचे २०१७ मध्ये नवापुरात राहणाऱ्या तरुणाशी लग्न झाले होते. 

ठळक मुद्देवधूच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने वडिलांनी शक्य त्या पद्धतीने मुलीचं लग्न लावून दिलं. अखेर तिने पतीबरोबरच सासरच्या मंडळींविरोधातही तक्रार दाखल केली. 

गुजरातमधील सुरतमध्ये महीधरपुरा येथील एका महिलेने तिची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात सासरची मंडळी आणि पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. २७ वर्षीय पीडित महिलेला व्हॉट्सअॅप वेबवरुन पती गे असल्याचे लग्नाच्या पाच वर्षांनंतर कळालं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. 

गेल्या पाच वर्षांत पतीने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवलेच नाही. अनेकदा पती काहीही कारण देत विषय टाळत होता. अखेर याबाबत धक्कादायक माहिती उघड झाली असून पत्नीने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरतच्या गोपीपुरा भागात राहणाऱ्या एका महिलेचे २०१७ मध्ये नवापुरात राहणाऱ्या तरुणाशी लग्न झाले होते. 

वधूच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने वडिलांनी शक्य त्या पद्धतीने मुलीचं लग्न लावून दिलं. मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून हुंड्यासाठी सासरकडून त्रास देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर १५ हजार रुपयांची एफडी देखील करून दिली. लग्नानंतर तीन वर्षांनंतरही पतीने पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवले नाही. तो पत्नीसोबत खोलीत झोपण्यास नकार देत होता. पती आईसोबत झोपत होता. यावर पत्नीने विचारले असता आईच्या आजारपणाचे कारण सांगून तो विषयाला कलाटणी देत होता.

एकदा पतीचा मोबाईल पत्नीच्या हाती लागला. तिने व्हॉट्सअॅप वेबवरुन मोबाइल कनेक्ट केला. त्यानंतर तिने जे काही पाहिलं त्यामुळे तिला धक्का बसला. या व्हॉट्सअॅप चॅटवरुन आपला पती गे म्हणजे समलैंगिक असल्याचे कळताच तिची झोप उडाली. तसेच त्याचे इतर पुरुषांशी प्रेमसंबंध आहे हे तिला कळले आणि तिला खूप मोठा धक्का बसला.  यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. लग्नानंतर सासरच्यांकडून हुंड्यासाठी वारंवार छळ केला जात होता. सासरच्यांनी तिचा मानसिक छळ केला. महिलेच्या वडिलांनी लग्नानंतर १ लाखांची रक्कम एफडीमधून काढून दिले. दुसरीकडे मुल होत नसल्यामुळे सासरच्यांकडून तिला टोमणे ऐकावे लागत होते, अशा प्रकारे अनेक छळ पीडित महिलेवर होत होते. अखेर तिने पतीबरोबरच सासरच्या मंडळींविरोधातही तक्रार दाखल केली. 

टॅग्स :GujaratगुजरातPoliceपोलिसWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप