काय सांगता? घरात गांजाची चक्क १५ झाडे!, अकोला येथील धक्कादायक प्रकार

By नितिन गव्हाळे | Updated: October 1, 2022 17:09 IST2022-10-01T17:09:00+5:302022-10-01T17:09:33+5:30

पातूर येथे विशेष पथकाची कारवाई: २१ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त

what do you say Almost 15 plants of ganja in the house Shocking incidence in Akola | काय सांगता? घरात गांजाची चक्क १५ झाडे!, अकोला येथील धक्कादायक प्रकार

काय सांगता? घरात गांजाची चक्क १५ झाडे!, अकोला येथील धक्कादायक प्रकार

नितीन गव्हाळे, अकोला: पातूर शहरातील भिम नगरात राहणाऱ्या एका व्यक्तीने घराच्या मागील अंगणात चक्क गांजाच्या १५ झाडांची लागवड केल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाला मिळाली. पथकाने शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास छापा घातला असता, अंगणात गांजाची १५ झाडे आढळून आली. पोलिसांनी २१ किलो वजनाची गांजाची जप्त केली आहेत.

विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना, पातूर शहरातील भिम नगरात एकाने अंगणात गांजाची झाडे लागवड केली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने छापा घालून आरोपी शेख कय्युम शेख करीम(४४ रा. भिम नगर) याच्या घराच्या अंगणातील १३ फूट उंचीची गांजाची १५ हिरवीगार झाडे जप्त केली. या झाडांचे एकूण वजन २१ किलो असून, त्याची किंमत १ लाख ५ हजार रूपये आहे. आरोपी शेख कय्युम याने घरात गांजाच्या झाडांची लागवड करून त्याचे संगोपन करीत होता. झाडाची पाने वाळवून नंतर त्याची अवैध विक्री करीत होता. आरोपी शेख कय्यूम शेख करीम याच्याविरुद्ध पातूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट कलम २० ब नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: what do you say Almost 15 plants of ganja in the house Shocking incidence in Akola