पत्नीला तलाक देणं महागात पडलं; सासरच्यांनी साखळीने बांधून चपलांचा हार घालून 'त्याला' धू-धू धुतलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 11:17 AM2021-07-26T11:17:11+5:302021-07-26T11:31:01+5:30

Husband punished for saying triple talaq : गळ्यात चपलांचा हार घालून साखळीने बांधून मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

west bengal husband punished for saying triple talaq in laws tied and beat her with sticks | पत्नीला तलाक देणं महागात पडलं; सासरच्यांनी साखळीने बांधून चपलांचा हार घालून 'त्याला' धू-धू धुतलं 

पत्नीला तलाक देणं महागात पडलं; सासरच्यांनी साखळीने बांधून चपलांचा हार घालून 'त्याला' धू-धू धुतलं 

Next

नवी दिल्ली - पत्नीला ट्रिपल तलाक (Triple Talaq) देणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. नागरिकांनी त्याची यथेच्छ धुलाई केल्याची घटना समोर आली आहे. गळ्यात चपलांचा हार घालून साखळीने बांधून मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पश्चिम बंगालच्या गोआलपोखर परिसरात ही घटना घडली आहे. व्हिडीओचा तपास केला असता ही माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये ज्या व्यक्तीचा धुलाई होत आहे त्याच्यावर आपल्या पत्नीला ट्रिपल तलाक दिल्याचा आरोप आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील लोकांनी या व्यक्तीच्या सासरच्या मंडळींसोबत बैठक घेत यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा तरुण या बैठकीत सहभागी झाला नाही. यानंतर त्याच्या सासरच्या मंडळींनी त्याला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. याच कारणामुळे आधी त्याला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 2 वर्षांपूर्वी चारघरिया येथील रहिवासी असलेल्या फिरोजाचं लग्न ड्रायव्हरचं काम करणाऱ्या तौफीक आलम नावाच्या एका व्यक्तीसोबत झालं. लग्नानंतर काही काळातच दोघांमध्ये वाद होऊ लागले. 

वाद वाढल्याने अनेकदा तौफीकनं आपल्या पत्नीला मारहाण केली. मात्र ती सर्व सहन करत राहिली. जेव्हा तौफीकने तिला ट्रिपल तलाक दिला तेव्हा तिने आपल्या माहेरी फोन केला. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तौफीकची यथेच्छ धुलाई केली. मुलीच्या कुटुंबीयांनी तौफीकच्या गळ्यात चपलांचा हारही घातला आणि त्याला जमिनीवर बसवलं. यादरम्यान कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट केला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तौफीकच्या कुटुंबीयांचा असा आरोप आहे, की या घटनेनंतर तो कुठेही सापडत नाही आहे. पोलिसांनीही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

संतापजनक! विद्यार्थिनीला शिक्षक पाठवायचा अश्लील मेसेज; घरच्यांनी शिकवला चांगलाच धडा, केली यथेच्छ धुलाई

शाळेतील विद्यार्थिनीला शिक्षकच अश्लील मेसेज पाठवत असल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. मुलीच्या घरच्यांशी आरोपी शिक्षकाला चांगलाच धडा शिकवला असून त्याची यथेच्छ धुलाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात ही लज्जास्पद घटना घडली आहे. विद्यार्थिनीला मोबाईलवर शाळेतील शिक्षक अश्लील मेसेज पाठवत होता. यामुळे त्रस्त झालेल्या मुलीने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला आणि धक्कादायक प्रकार उघड झाला. मुलीने भयंकर प्रकार सांगितल्यानंतर संतापलेल्या कुटुंबीयांनी शिक्षकाची धुलाई केली आहे. फतेहपूरच्या मारडाटू गावात एक सरकारी शाळा आहे. या शाळेतील गणिताच्या शिक्षकाने हे कृत्य केलं आहे. सुरेश कुमार असं या आरोपीचं नाव आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपी शिक्षकाला पकडलं आणि मारहाण केली आहे.

Web Title: west bengal husband punished for saying triple talaq in laws tied and beat her with sticks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app