धक्कादायक! अवघ्या 10 रुपयांसाठी मित्राने केली मित्राची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 15:16 IST2022-12-15T15:14:22+5:302022-12-15T15:16:16+5:30
पश्चिम बंगालमध्ये अवघ्या 10 रुपयांसाठी मित्राने आपल्याच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिलीगुडीमध्ये दहा रुपयांवरून झालेल्या भांडणातून एका तरुणाने आपल्या मित्राची दगडाने ठेचून हत्या केली.

धक्कादायक! अवघ्या 10 रुपयांसाठी मित्राने केली मित्राची हत्या
पश्चिम बंगालमध्ये अवघ्या 10 रुपयांसाठी मित्राने आपल्याच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिलीगुडीमध्ये दहा रुपयांवरून झालेल्या भांडणातून एका तरुणाने आपल्या मित्राची दगडाने ठेचून हत्या केली. या संदर्भात पोलिसांनी गुरुवारी माहिती दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 20 वर्षीय रामप्रसाद साहा यांचा मृतदेह बुधवारी बैकुंठपूरच्या जंगलात सापडला. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान असे आढळून आले की, साहा यांना अंमली पदार्थांचे व्यसन होते. सोमवारी साहा त्याच्या दोन मित्रांसह जंगलात गेला होता - सुब्रत दास (22) आणि अजय रॉय (24), जे स्वतः ड्रग्ज व्यसनी आहेत.
क्रूरतेचा कळस! प्रश्नाचं उत्तर न आल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला जमिनीवर पाडलं, डोकंच फोडलं अन्...
मद्यधुंद साहाकडे पैसे नसल्याचे आढळून आले. आणखी ड्रग्ज घेण्यासाठी त्याने सुब्रताकडे दहा रुपये मागितले. साहा आणि सुब्रत यांच्यात पैशाच्या मागणीवरून भांडण झाले. यादरम्यान सुब्रतने साहा यांची दगडाने ठेचून हत्या केल्याचा आरोप आहे.
सुब्रत आणि अजय यांना बुधवारी रात्री सिलीगुडी मेट्रो पोलिसांच्या आशिघर चौकीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. या प्रकरणात अजयच्या भूमिकेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.