शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

West Bengal Assembly Election 2021: बापरे! पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान मोठा हिंसाचार; गोळीबारात चौघांचा मृत्यू, 4 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 13:18 IST

West Bengal Assembly Election 2021 : पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान बूथ क्रमांक 285 मध्ये मतदान केंद्राबाहेर गोळीबार करण्यात आला.

नवी दिल्ली - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Election 2021) चौथ्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. 44 जागांसाठी हे मतदान होत असून मागील दोन टप्प्यांतील हिंसाचारामुळे निवडणूक आयोगाची मोठी परीक्षा आहे. विविध जागांवर हिंसाचार टाळण्याचे सुरक्षा यंत्रणांसमोर आव्हान आहे. उत्तर बंगालमधील कूचबिहार, अलीपुरदवार तसेच दक्षिण 24 परगणा, हावडा व हुगली जिल्ह्यातील 44 जागांवर मतदान होत आहे. याच दरम्यान आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान करण्यात आलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कूचबिहारच्या सितालकुचीमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे काही कार्यकर्ते हे आपापसात भिडले. या हाणामारीत अनेक लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान बूथ क्रमांक 285 मध्ये मतदान केंद्राबाहेर गोळीबार करण्यात आला. यामध्ये मतदान करण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. तसेच सुरक्षा दलाकडून करण्यात आलेल्या  गोळीबारामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 4 जण जखमी झाले आहेत. 

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आनंद बर्मन नावाच्या तरुणाला बाहेर ओढत आणण्यात आलं आणि गोळी मारुन त्याची हत्या केली. घटनेच्या वेळी मतदान सुरू होतं. या घटनेनंतर भाजपा आणि तृणमूलच्या समर्थकांमध्ये झडप झाली. यात बॉम्बही फेकण्यात आल्याने अनेक लोक जखमी झाले. केंद्रीय दलांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. तरुणाच्या कुटुंबीयांनी तृणमूल काँग्रेसवर हत्येचा आरोप केला आहे. 

तृणमूल काँग्रेसने यात भाजपाचा हात असल्याचा केला आरोप

हत्या झालेला तरुण हा भाजपाचा समर्थक होता. त्यामुळेच त्याला गोळी मारल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने यात भाजपाचा हात असल्याचा आरोप केला आहे. भाजपाने हा तरुण मतदान केंद्रावर पोलिंग एजंट होता असा दावा केला आहे. तसेच याच दरम्यान भाजपा उमेदवार लॉकेट चॅटर्जी यांच्या कारवर देखील हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये चॅटर्जी यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. लॉकेट चॅटर्जी यांनी यासाठी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! छापेमारीसाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला जमावानं घेरलं; बेदम मारहाण करत केली हत्या

 बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. छापेमारी करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला संतप्त जमावाने बेदम मारहाण करत हत्या भयंकर घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार. बिहारमधील किशनगंज नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अश्विनी कुमार (Ashwini Kumar) हे एका लुटमारीच्या प्रकरणात छापेमारी करण्यासाठी ते बंगालमध्ये गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत पोलिसांचं एक विशेष पथकही होतं. दरम्यान हिंसक जमावाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली आहे. या प्रकारानंतर पोलीस विभागात संताप व्यक्त केला जात आहे.

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ElectionनिवडणूकFiringगोळीबारDeathमृत्यूPoliceपोलिसVotingमतदानTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपा