थेरगाव येथे पित्याने केले पोटच्या दोन मुलींवर कोयत्याने वार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 16:46 IST2019-04-10T16:43:48+5:302019-04-10T16:46:21+5:30

शिवीगाळ करीत पित्याने कोयत्याने वार केल्याने दोन बहिणी जखमी झाल्या.

weopan attack on two daughters by father in thergaon | थेरगाव येथे पित्याने केले पोटच्या दोन मुलींवर कोयत्याने वार 

थेरगाव येथे पित्याने केले पोटच्या दोन मुलींवर कोयत्याने वार 

ठळक मुद्दे आई-वडिलांच्या भांडणात दोन्ही बहिणी जखमी

पिंपरी : शिवीगाळ करीत पित्याने कोयत्याने वार केल्याने दोन बहिणी जखमी झाल्या. थेरगाव येथे मंगळवारी (दि. ९) ही घटना घडली. वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास नामदेव सुबुगडे (वय ४५, रा. गुरुनानक नगर, थेरगाव) असे गुन्हा दाखल केलेल्या पित्याचे नाव आहे. सीता विलास सुबुगडे (वय ३४) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. निकिती सुबुगडे आणि नीता सुबुगडे असे जखमी झालेल्या बहिणींची नावे आहेत. 
विलास आणि सीता सुबुगडे पती-पत्नी आहेत. निकिता आणि नीता सुबुगडे त्यांच्या मुली आहेत. सुबुगडे कुटुंबीय मंगळवारी (दि. ९) दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरात होते. सुबुगडे पती-पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा घरात होता. यावेळी विलास सुबुगडे याने लोखंडी कोयता हातात घेऊन पत्नी सीता यांना तू माझ्याविरुद्ध विरूध्द पोलिसांत तक्रार करतेस काय? असे म्हणून मारण्यास आला. त्यावेळी त्यांची मोठी मुलगी निकिता हिने पकडले असता तिला शिवीगाळ करून तिच्या हाताच्या मनगटाजवळ वार करून तिला गंभीर जखमी केले. तसेच लहान मुलगी निता ही देखील भांडणे सोडविण्यासाठी आली असता विलास याने तिच्या डाव्व्या कानाच्या खाली मानेवर कोयत्याने वार करून तिला देखील गंभीर जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: weopan attack on two daughters by father in thergaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.