मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये गेला, जेवणाच्या बहाण्याने एकटाच बाहेर पडला; स्टाफने रूमचा दरवाजा उघडताच बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 13:59 IST2026-02-11T13:58:33+5:302026-02-11T13:59:53+5:30

मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मृत आरती आपल्या प्रियकरासोबत मलोट रोडवरील एका हॉटेलमध्ये आली होती. दोघांनी रीतसर रूम बुक केली. मात्र..

Went to a hotel with a friend, left alone on the pretext of having dinner; shocked when the staff opened the room door | मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये गेला, जेवणाच्या बहाण्याने एकटाच बाहेर पडला; स्टाफने रूमचा दरवाजा उघडताच बसला धक्का

AI Generated Image

पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यातील अबोहरमध्ये प्रेमाच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत क्रूर घटना उघडकीस आली आहे. एका १८ वर्षीय तरुणीची तिच्याच प्रियकराने हॉटेलच्या खोलीत निर्घृण हत्या केली. धारदार शस्त्राने गळा चिरून तिची जीवनयात्रा संपवल्यानंतर, आरोपी प्रियकर जेवण आणण्याचे निमित्त करून हॉटेलमधून पसार झाला. हॉटेल कर्मचाऱ्यांनी खोली उघडली तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मृत आरती आपल्या प्रियकरासोबत मलोट रोडवरील एका हॉटेलमध्ये आली होती. दोघांनी रीतसर रूम बुक केली. मात्र, रूममध्ये गेल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच, म्हणजेच ५:३० वाजता आरोपी तरुण बाहेर आला. "झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करायचे आहे, मी बाहेर जाऊन बघतो," असे हॉटेल स्टाफला सांगून तो बाहेर पडला. मात्र, तो बराचवेळ झाला तरी परतला नाही.

हॉटेल स्टाफला संशय आला अन्...

रात्री ७ वाजेपर्यंत रूममधून कोणतीही हालचाल न झाल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर कर्मचाऱ्यांनी मास्टर चाबीने दरवाजा उघडला. समोरचे दृश्य पाहून कर्मचारी हादरून गेले. आरतीचा मृतदेह जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती आणि शरीर अर्धवट नग्न अवस्थेत होते. तिच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून गळा चिरण्यात आला होता.

पोलिसांकडून हॉटेल सील, आरोपीची ओळख पटली

घटनेची माहिती मिळताच सिटी पोलीस ठाण्याचे एसएचओ हरविंदर सिंह आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने हॉटेल सील करून सीसीटीव्ही फुटेज आणि रजिस्टर ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात आरोपीची ओळख पटली असून पोलीस त्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.

हॉटेल मालकावरही कारवाईची टांगती तलवार

मृत आरतीचे वय १८ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे, मात्र पोलीस अधिकृत वयाची खात्री करत आहेत. जर ही मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले, तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापकावरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या कृत्यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Web Title : गर्लफ्रेंड की होटल में हत्या; स्टाफ को लाश देखकर लगा सदमा

Web Summary : अबोहर में एक व्यक्ति ने अपनी 18 वर्षीय गर्लफ्रेंड की होटल के कमरे में गला रेतकर हत्या कर दी। वह खाना ऑर्डर करने का बहाना बनाकर चला गया। होटल कर्मचारियों को उसका शरीर बंधा हुआ और आंशिक रूप से नग्न मिला, जिससे पुलिस जांच शुरू हो गई।

Web Title : Girl murdered in hotel by boyfriend; staff shocked to find body.

Web Summary : In Abohar, a man murdered his 18-year-old girlfriend in a hotel room, slitting her throat. He left, feigning a food order. Hotel staff found her body, bound and partially nude, triggering a police investigation and potential action against the hotel.