इंस्टाग्राम फ्रेंडसोबत नाइट आउटला गेले, पण मध्यरात्री माझ्यासोबत भयंकर घटना; मुंबईतील तरुणीची आपबिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 20:22 IST2024-01-27T20:21:36+5:302024-01-27T20:22:12+5:30
इंस्टाग्रामवर झालेल्या चॅटिंगनंतर पीडित तरुणीने हेतिक शाह याच्यासोबत नाइट आऊट करण्याचे ठरवले होते.

इंस्टाग्राम फ्रेंडसोबत नाइट आउटला गेले, पण मध्यरात्री माझ्यासोबत भयंकर घटना; मुंबईतील तरुणीची आपबिती
Mumbai Crime ( Marathi News ) : राज्याची राजधानी असलेलया मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २१ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. नशेत असताना माझ्या सोशल मीडिया फ्रेंडने माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. तरुणीने इन्स्टाग्रामवर याबाबत सविस्तर पोस्ट लिहिली आहे.
पीडित तरुणीच्या इंस्टाग्राम पोस्टनुसार, तिच्यावर १३ जानेवारी रोजी अतिप्रसंग करण्यात आला. ती तेव्हाच हेतिक शाह आरोपीला पहिल्यांदाच भेटली होती. त्याआधी त्यांच्यात इंस्टाग्रावरच बोलणं होत असत. तरुण-तरुणीचे काही म्युच्युअल फ्रेंड्स होते. इंस्टाग्रामवर झालेल्या चॅटिंगनंतर पीडित तरुणीने हेतिक शाह याच्यासोबत नाइट आऊट करण्याचे ठरवले. मात्र माझ्यासाठी ही रात्र भयंकर ठरल्याचं तरुणीने सांगितलं आहे. यावेळी झालेल्या पार्टीत त्याने मला दारू पिण्यास प्रवृत्त केलं. त्यानंतर मला काही कळेनासे झाले. त्याने मला दारूसोबत नशेची गोळीही दिल्याचा मला संशय आहे. त्यानंतर जेव्हा मी शुद्धीत आले तेव्हा तो माझा रेप करत होता. मी त्याला रोखण्याचा प्रयत्न करताच त्याने मला दोन-तीन कानशिलात लगावल्या, असा आरोप तरुणीने केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल झाला असली तरी अद्याप त्याला अटक करण्यात आली नसून त्याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी पीडितेने केली आहे.