देव दर्शनासाठी गेले अन् घडला "हा" प्रकार; सीसीटीव्हीत घटना कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 21:01 IST2021-11-10T21:00:20+5:302021-11-10T21:01:43+5:30

Dacoity Case : कुटुंब देवदर्शनासाठी बाहेर गेले असता चोरांनी लाखोंचा ऐवज लंपास करत पोबारा केला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Went for God darshan and happened "this" type; Incident captured on CCTV | देव दर्शनासाठी गेले अन् घडला "हा" प्रकार; सीसीटीव्हीत घटना कैद

देव दर्शनासाठी गेले अन् घडला "हा" प्रकार; सीसीटीव्हीत घटना कैद

कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बंद घरांना लक्ष करून चोरटे लाखोंचा ऐवज लंपास करत आहेत. कल्याण शीळ रोडवरही अशीच एक चोरीची घटना घडली आहे. कुटुंब देवदर्शनासाठी बाहेर गेले असता चोरांनी लाखोंचा ऐवज लंपास करत पोबारा केला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
           

कल्याण शीळ रोडवर असलेल्या वैभव नगरी परिसरात  गजानन पाटील राहतात.पाटील हे आपल्या कुटुंबासोबत देवदर्शनासाठी पंढरपूरला गेले होते. या संधीचा फायदा घेत त्यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. जवळपास  3 लाखांचा मुद्देमाल  चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून  या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

Web Title: Went for God darshan and happened "this" type; Incident captured on CCTV