‘लाचलुचपत’ ची कारवाई भोवली, वारजे माळवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 01:36 AM2020-07-09T01:36:25+5:302020-07-09T01:36:59+5:30

एका दुकानदाराकडून ५० हजारांची लाच मागितली होती.

Warje Malwadi senior police inspector transferred for 'bribery' action | ‘लाचलुचपत’ ची कारवाई भोवली, वारजे माळवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली

‘लाचलुचपत’ ची कारवाई भोवली, वारजे माळवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली

googlenewsNext

पुणे : दुकानदाराच्या दुकानातील डीव्हीआर काढून आणून तो परत देण्याच्या बदल्यात लाच मागितल्याप्रकरणी लाच लचुपत प्रतिबंधक विभागाने केलेली कारवाई वारजे माळवाडीपोलिसांना भोवली आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी गुन्हे शाखेचे निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्याचवेळी वारजे माळवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांची मात्र दुसरीकडे नेमणूक करण्यात आलेली नाही.
पुणे शहर पोलीस आयुक्तालय पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवत मिसाळ हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत.त्यांच्या जागी खडकी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी दत्तवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सहाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
गुटखा विक्री करतो, असे सांगून एका दुकानदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विलास तोगे याच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करुन त्याला अटक केली होती. तसेच या प्रकरणात खंडणी विरोधी पथकातील दोघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील ही बदली अपेक्षित होती.

Web Title: Warje Malwadi senior police inspector transferred for 'bribery' action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.