वॉर्डबॉयच बनला डॉक्टर...टाेचले चुकीचे इंजेक्शन अन् बेतले तरुणीच्या जिवावर; आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 08:40 IST2026-02-09T08:39:58+5:302026-02-09T08:40:40+5:30

वाशीची घटना : मानखुर्दला राहणाऱ्या आरोपीला अटक, संदेश पाष्टे मानखुर्दमध्ये राहतो. त्या परिसरात तो डॉक्टर म्हणून परिचित आहे.  

Wardboy becomes doctor...gives wrong injection and kills young woman; accused arrested in Navi Mumbai | वॉर्डबॉयच बनला डॉक्टर...टाेचले चुकीचे इंजेक्शन अन् बेतले तरुणीच्या जिवावर; आरोपीला अटक

वॉर्डबॉयच बनला डॉक्टर...टाेचले चुकीचे इंजेक्शन अन् बेतले तरुणीच्या जिवावर; आरोपीला अटक

नवी मुंबई - एका वॉर्डबॉयने तरुणीला चुकीचे इंजेक्शन दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना ५ फेब्रुवारी रोजी घडली. विशेष म्हणजे हा वॉर्डबॉय डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करत होता. ही तरुणी वाशी येथील आहे. प्रचिती भुवड (२१) असे तिचे नाव आहे.

संदेश पाष्टे (३०) असे आरोपीचे नाव आहे. मृत तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून ६ फेब्रुवारीला त्याला अटक करण्यात आली. तरुणीच्या वडिलांनी त्याला तिच्या हॉर्मोनल आजारावर उपचार करण्यासाठी घरी बोलावले होते. खासगी नर्सिंग होममध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करणारा पाष्टे डॉक्टर म्हणून अनेकांवर उपचार करत होता. प्रचितीचे वडील भिकुराम भुवड यांनी त्यांच्या परिचयातून पाष्टेला उपचारासाठी घरी बोलवले होते. त्यानुसार त्याने तरुणीची घरी येऊन तपासणी केली आणि एक इंजेक्शन दिले होते. मात्र, इंजेक्शनच्या दुष्परिणामुळे तिचा त्रास वाढला. त्यामुळे त्याने तिला पुन्हा एक इंजेक्शन दिले. त्याने तिची प्रकृती आणखी खालावली आणि मृत्यू झाला.  

तरुणीला इंजेक्शन देणाऱ्या आरोपी पाष्टेची पोलिसांनी चौकशी केली असता तो अंधेरीतल्या सिद्धी नर्सिंग होममध्ये वॉर्डबॉय म्हणून नोकरी करती असल्याचे  स्पष्ट झाले. त्याला अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी सांगितले.

डॉक्टर म्हणवून घेत केले होते अनेकांवर उपचार 
संदेश पाष्टे मानखुर्दमध्ये राहतो. त्या परिसरात तो डॉक्टर म्हणून परिचित आहे. त्याने अनेकांवर उपचार केल्याचेही चौकशीतून स्पष्ट झाले. त्याने प्रचितीला कोणती इंजेक्शन्स दिली, याचा पोलिस तपास सुरू आहे.  

उपचारासाठी घेतले १५ हजार रुपये
आरोपी पाष्टेने प्रचितीवर उपचारासाठी १५ हजार रुपये घेतल्याचे स्पष्ट आहे. हार्मोनल आजारावरील इंजेक्शन देण्यासाठी साधारणपणे एक हजार रुपयांपर्यंत फी घेतली जाते, मात्र आरोपीने १५ हजार रुपये उकळले, असे तपासातून स्पष्ट झाले आहे.

Web Title : वार्ड बॉय बना डॉक्टर, गलत इंजेक्शन से युवती की मौत

Web Summary : नवी मुंबई में एक वार्ड बॉय ने डॉक्टर बनकर युवती को गलत इंजेक्शन दिया, जिससे उसकी मौत हो गई। आरोपी संदेश पाष्टे को गिरफ्तार कर लिया गया है। उसने इलाज के लिए 15 हजार रुपये लिए थे। मृतका के पिता ने शिकायत दर्ज कराई।

Web Title : Ward Boy Becomes Doctor, Fatal Injection Kills Young Woman

Web Summary : A ward boy posing as a doctor in Navi Mumbai administered a fatal injection to a young woman, Prachiti Bhuvad, leading to her death. The accused, Sandesh Pashte, has been arrested following a complaint by the victim's father. He charged ₹15,000 for the treatment.