देवाला भेटण्याची इच्छा; महिलेने उचलले टोकाचे पाऊल, 5व्या मजल्यावरुन उडी मारुन संपवले आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 20:24 IST2025-08-03T20:23:09+5:302025-08-03T20:24:57+5:30
पोलिसांना महिलेने लिहिलेली चिठ्ठी सापडली, ज्यात कारण सांगितले आहे.

देवाला भेटण्याची इच्छा; महिलेने उचलले टोकाचे पाऊल, 5व्या मजल्यावरुन उडी मारुन संपवले आयुष्य
हैदराबादच्या हिमायतनगर भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४३ वर्षीय महिलेने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पूजा जैन असे महिलेनेच नाव असून, तिचा पती अरुण कुमार जैन ऑफिसला गेला असताना पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. यामागील एक धक्कादायक कारण समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पूजा जैन हिने स्वतःला आध्यात्मात गुंतवून ठेवले होते. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे, ज्यात पूजाने देवाला भेटण्यासाठी बलिदान देत असल्याचा उल्लेख केल आहे.
शेजाऱ्यांच्या मते, पूजा अलिकडच्या काळात ध्यान, पूजा आणि धार्मिक ग्रंथांमध्ये अति रस घेऊ लागली होती. ती अनेकदा म्हणायची की, आता तिला सांसारिक जीवनातून मुक्तता हवी आहे, देवाचा आश्रय घ्यायचा आहे. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.