बसची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 19:16 IST2018-12-07T19:13:31+5:302018-12-07T19:16:05+5:30
बसची वाट पाहत थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशाला दमदाटी करीत त्याच्याकडील ऐवज चोरट्यांनी चोरला.

बसची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशाला लुटले
पिंपरी : बसची वाट पाहत थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशाला दमदाटी करीत त्याच्याकडील ऐवज चोरट्यांनी चोरला. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास निगडीतील भक्ती-शक्ती चौकात घडली.
प्रेम सुंदर मारवाडी (वय १८, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारवाडी हे पीएमपी बसने आल्यानंतर निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उतरले. चौकातच देहूरोडला जाणाऱ्या बसची वाट पाहत उभे असताना तीन जण त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने मारवाडी यांच्या कमरेला धरत, आमच्याबरोबर चल नाही तर तुला मारील, अशी धमकी दिली. त्यानंतर रस्त्याकडेला असलेल्या एका झाडाखाली नेले व त्यांच्याकडील मोबाईल व दीड हजार रुपयांची रोकड असा साडेआठ हजारांचा ऐवज जबरदस्तीने लुटून केला. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.