अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो इंस्टाग्रामवर केले व्हायरल, आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By भगवान वानखेडे | Updated: March 22, 2023 18:10 IST2023-03-22T18:09:29+5:302023-03-22T18:10:04+5:30
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस २२ मार्च रोजी अटक केली असून, न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली आहे.

अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो इंस्टाग्रामवर केले व्हायरल, आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बुलढाणा : शिकवणी वर्गाला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करणाऱ्या, मोबाइल नंबर देऊन माझ्याशी बोल असे म्हण्याचा अट्टाहास करण्या, तसेच पीडितेचे अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल करणाऱ्या आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात २१ मार्च रोजी तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस २२ मार्च रोजी अटक केली असून, न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली आहे.
पीडितेच्या आईने २१ मार्च रोजी शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, त्या स्वत: पोलीस कॉन्स्टेबल म्हणुन कार्यरत आहेत. मागील वर्षी त्या प्रशिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर गेल्या असताना त्याच दरम्यान त्यांची आई आणि मुलगी बुलढाणा तालुक्यातील एका गावात लग्न समारंंभासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी ओम रामेश्वर पुरभे याची भेट झाल्यानंतर तो त्यानंतर सतत घरी येत होता. यावेळी आरोपीने फिर्यादीच्या पीडित मुलीशी जवळीक साधून तिचा शिकवणी वर्गाला जात असताना पाठलाग करीत होता. याच दरम्यान त्याने त्याचा फोन नंबर पीडितेला देऊन ‘माझ्याशी बोल, तू फोन का घेत नाही’ म्हणुन धमकावत असल्याचेही तक्रारीत नमुद आहे.
बदनामीकारक फोटो केले व्हायरल
आरोपीने १५ जानेवारी रोजी पीडितेचे अश्लील बदनामीकारक फोटो तसेच ७ आणि २७ फेब्रुवारी रोजी पीडितेचे अश्लील फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल करुन पीडितेची आणि तिच्या कुटुंबियांची बदनामी केली. ऐवढेच नव्हे तर पीडितेला वेगवेगळ्या क्रमांकावरुन फोन व मॅसेज पाठवित असल्याचेही तक्रारीत नमुद आहे. तर २१ मार्च रोजीही आरोपीने पीडितेचा पाठलाग करुन तिचा हात पकडून विनयभंग केला. अशा तक्रारीवरुन शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी कारागृहात
२१ मार्च रोजी तक्रारीवरुन आरोपी ओम रामेश्वर पुरभे याच्याविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली. तर २२ मार्च रोजी आरोपीस न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे.