खराळवाडीत पूर्ववैमनस्यातून हाणामारी ; पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 14:24 IST2018-12-08T14:23:12+5:302018-12-08T14:24:11+5:30

पूर्ववैमनस्यातून खराळवाडी येथे टोळक्याने फिर्यादीला मारहाण करून जखमी केले.

violence due to former quarrel; Filed a complaint against five people | खराळवाडीत पूर्ववैमनस्यातून हाणामारी ; पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल 

खराळवाडीत पूर्ववैमनस्यातून हाणामारी ; पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल 

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून खराळवाडी येथे टोळक्याने फिर्यादीला मारहाण करून जखमी केले. ही घटना शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. या प्रकरणी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीुनसार, जफर अब्दुल अझाद (वय २०,रा. खराळवाडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. योगेश धोत्रे (वय २५,रा.खराळवाडी), सागर वीटकर (वय २२,काळेवाडी), आकाश जाधव (वय २३, रा.खराळवाडी), अतुल धोत्रे (वय २७,रा.खराळवाडी), राजू चौघुले (वय १९,रा.खराळवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबतची सविस्तर माहिती अशी, खराळवाडीतील घराजवळ उभे होते. त्यांना मोबाईलवर योगशने संपर्क साधला. कोठे आहेस? मला तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगितले. त्यास घराजवळ आहे, असे फिर्यादीने सांगितले. काही वेळातच योगेश काही साथीदारांना घेऊन तेथे आला. काहीही न बोलता त्याने फिर्यादीवर हल्ला चढविला. लाथा बुक्यांनी मारहाण करू लागला. त्यावेळी योगेश धोत्रे याने हातातील कोयता उलटा करून फिर्यादीच्या डोक्यात मारले. त्याचवेळी सागर विटकर याने हातातील वस्तुने फिर्यादीच्या डोळ्यावर मारल्यामुळे त्यांच्या डोळयाला गंभीर इजा झाली. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: violence due to former quarrel; Filed a complaint against five people