विजय सिंह मृत्यू प्रकरण : आंदोलकांनी रोखला सायन - पनवेल महामार्ग; पोलिसांच्या गाडीवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 03:46 PM2019-10-29T15:46:06+5:302019-10-29T15:49:43+5:30

पोलिसांच्या गाडीवर देखील दगडफेक करत आंदोलकांनी असंतोष व्यक्त केला.

Vijay Singh custodial death case: protesters blocked sion - Panvel Highway; Stone plenting on a police van | विजय सिंह मृत्यू प्रकरण : आंदोलकांनी रोखला सायन - पनवेल महामार्ग; पोलिसांच्या गाडीवर दगडफेक

विजय सिंह मृत्यू प्रकरण : आंदोलकांनी रोखला सायन - पनवेल महामार्ग; पोलिसांच्या गाडीवर दगडफेक

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी तीव्र पडसाद उमटत स्थानिकांनी आंदोलनाचा पवित्रा उचलत चुनाभट्टी येथे सायन पनवेल महामार्ग तर शिवडी चेंबूर मार्ग रोखला आहे.विजय सिंह (२६) असं या तरुणाचं नाव असून ही घटना २७ ऑक्टोबरला उशिरा रात्री घडली होती.

मुंबई - वडाळा टी. टी. पोलीस ठाणे परिसरात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विजय सिंह (२६) असं या तरुणाचं नाव असून ही घटना २७ ऑक्टोबरला उशिरा रात्री घडली होती. याप्रकरणी तीव्र पडसाद उमटत स्थानिकांनी आंदोलनाचा पवित्रा उचलत चुनाभट्टी येथे सायन पनवेल महामार्ग तर शिवडी चेंबूर मार्ग रोखला आहे. तसेच पोलिसांच्या गाडीवर देखील दगडफेक करत आंदोलकांनी असंतोष व्यक्त केला.

२७ ऑक्टोबरला रात्री ११.३५ वाजताच्या सुमारास वडाळा टी. टी. पोलिसांची मोबाईल व्हॅन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री गुन्हे प्रतिबंधक गस्तीवर असतान एमएमआरडीए कंपाउंड या ठिकाणी काहीजण आपसात वाद घालत असताना आढळून आले. त्यावेळी त्यांना पुढील कारवाईसाठो वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात येण्यात आले. त्यावर तक्रारदार याने दिलेल्या तक्रारीवरून भा. दं. वि. कलम ३२३, ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला. दरम्यान तक्रार दाखल करत असताना विरोधक इसम असलेल्या विजयसिंह हृदयनारायण सिंह (२६) याच्या छातीत अचानक दुखत असल्याचे सांगितल्यानंतर त्याला तात्काळ सायन रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला दाखलपुर्व मृत घोषित केले अशी माहिती पोलिसांनी दिली. 

या घटनेबाबत मृत विजयच्या पालकांनी आवाज उठवताच संबंधित पोलिसांचे निलंबन करण्यात आले. राष्ट्रीय मानव अधिकार आयोग यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे या अपमृत्यु प्रकरणाची पोलीस कोठडीत मृत्युप्रमाणे चौकशी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मा. महानगर दंडाधिकारी यांनी सायन रुग्णालयात मृत विजयावर सविस्तर इन्क्वेट पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. 

विजय सिंह मृत्यू प्रकरणी ५ पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन

Web Title: Vijay Singh custodial death case: protesters blocked sion - Panvel Highway; Stone plenting on a police van

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.