शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस हे बसविलेले माणूस, पन्नास खोके हा गंमतीचा विषय नाही; राज ठाकरेंनी दिली ससाण्याची उपमा
2
लोंढ्यांचा त्रास कोण भोगतोय? मांजरेकरांचा प्रश्न, उद्धव ठाकरे म्हणाले आपण...; मांजरेकर म्हणाले मध्यमवर्गीय...
3
अमेरिकेत नोकरी हवीय? एका प्रश्नाने उडवली भारतीय विद्यार्थ्यांची झोप; न्यूयॉर्क टाइम्सचा मोठा खुलासा!
4
₹३,०००, ₹५,०००, ₹८,००० आणि ₹१०,००० च्या गुंतवणुकीवर किती रिटर्न? १५ वर्षांत किती जमेल फंड, जाणून घ्या
5
मुंबईकर म्हणून आज मला लाज वाटतेय... आणखी विकास नको; महेश मांजरेकरांचा उद्विग्न सवाल, खंतही व्यक्त...
6
"भगत सिंगांनी काँग्रेस सरकारवर बॉम्ब टाकला"; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा अजब दावा, ऐतिहासिक चुकीमुळे भाजपची नाचक्की
7
कलयुगी लेक! प्रियकरासाठी बापाचाच काटा काढला; आईनेही दिली साथ, 'त्या' हत्येचं असं उलगडलं रहस्य
8
बनावट FASTag Annual Pass द्वारे नवीन फ्रॉड, NHAI ने दिला इशारा; कसं वाचाल, जाणून घ्या
9
"मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथं काय हवं हे कळणार नाही"; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा
10
प्रेम, धोका अन् मर्डर! रेल्वे ट्रॅक शेजारी सापडलेल्या त्या मृतदेहाचा सस्पेन्स ११ महिन्यांनी संपला, सत्य ऐकून... 
11
अमेरिकेची सर्वात मोठी EXIT! ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडली, संयुक्त राष्ट्रांसह भारतालाही धक्का...
12
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक आहे 'या' व्यवसायिकाची नात; कोणता आहे त्यांचा बिझनेस? जाणून घ्या
13
Madhav Gadgil: ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन, वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
"तर मी स्वतःहून बाजूला होईल"; संतोष धुरींच्या भाजप प्रवेशानंतर देशपांडे म्हणाले, "मला अधिकार नाही"
15
रविवारी की सोमवारी, केव्हा सादर होणार देशाचा अर्थसंकल्प; तारखेवर शिक्कामोर्तब, जाणून घ्या
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानची झोप उडाली; युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेत ओतले कोट्यवधी रुपये!
17
"बापाच्या खांद्यावर मुलाची अंत्ययात्रा..."; वेदांताचे मालक ७५ टक्के संपत्ती समाजकार्यासाठी खर्च करणार
18
एकनाथ शिंदेंना दुखवायचे नसल्याने त्यांच्याशी युती केली; CM फडणवीसांनी सांगितली Inside Story
19
आजचे राशीभविष्य : गुरुवार ८ जानेवारी २०२६; या तीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी, मान व प्रतिष्ठा वाढेल
20
भाजप-काँग्रेस नगरसेवकांचा घरोबा; आधी अभद्र युती, नंतर डॅमेज कंट्रोल, अखेर कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना धारेवर धरणाऱ्या  महिलेचा व्हिडिओ व्हायरल, उलट-सुलट चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 23:18 IST

Nagpur News : कारवाईसाठी सरसावलेल्या वाहतूक पोलिसांना दमदाटी करत एका महिलेने चांगलाच गोंधळ घातला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे शहरात काही वेळ चांगलीच खळबळ उडाली होती.

नागपूर : कारवाईसाठी सरसावलेल्या वाहतूक पोलिसांना दमदाटी करत एका महिलेने चांगलाच गोंधळ घातला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे शहरात काही वेळ चांगलीच खळबळ उडाली होती. घटना गुरुवारी दुपारी शहीद चौक इतवारीत घडली. डबल सीट दुचाकीवर येताना पाहून शहीद चौकात वाहतूक पोलिसांनी एका महिलेला थांबण्याचा साठी हात दाखवला. मात्र पोलिसांना न जुमानता ती सुसाट वेगाने पुढे निघून गेली. संशय आल्यामुळे पोलिसांनी तिचा पाठलाग केला त्यामुळे ती घाबरली आणि बाजुच्या गल्लीत दुचाकी घसरून पडली. दरम्यान, पोलीस तेथे पोहोचले  त्यांनी तिला पळून जाण्याचे कारण विचारले  तिने पोलिसांना उत्तर देण्याऐवजी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. माझ्याकडे मास्क आहे,  हेल्मेट आणि परवानाही आहे. त्यामुळे तुम्ही मला थांबवलेच कसे, अशी विचारणा करून महिलेने वाहतूक शाखेच्या पोलिसांना धारेवर धरले. ती मोठमोठ्याने ओरडू लागली.दरम्यान, पोलिसांनी तहसील ठाण्यात माहिती देऊन मदत मागवली. मोठ्या प्रमाणात पोलिस आल्यामुळे बिथरलेल्या महिलेने बाजूच्या खड्डे कडे धाव घेतली. एका पोलिसांनी तिला कसेबसे तेथून दुचाकी जवळ आणले. त्यामुळे नंतर तिने दुचाकीचे डिक्की खोलून त्यातून बाटली काढली आणि पेट्रोल अंगावर घेऊन आत्महत्या करतो, असे मनात गोंधळ घातला. तिच्या या पवित्र्यामुळे पोलीस हादरले. काही पोलीस आणि गर्दी करणाऱ्या नागरिकांनीही तिला समजावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, महिला पोलिसांनी त्या त्या महिलेला आणि तिच्या मुलीला ताब्यात घेऊन तहसील ठाण्यात नेले. येथे ठाणेदार जयेश भांडारकर यांनी तिची आणि वाहतूक पोलिसांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर प्रकरण अदखलपात्र (एनसी)करीत तिला समज देऊन घरी पाठविण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे काही वेळ शहरात चांगलीच खळबळ उडाली होती.---

टॅग्स :Policeपोलिसnagpurनागपूर