व्हिडीओ वायरल! वकिलांमध्ये बेदम हाणामारी; पोलिसात तक्रार   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 16:03 IST2020-01-22T16:02:35+5:302020-01-22T16:03:40+5:30

मध्य प्रदेशातील सतना येथे ही घटना घडली आहे. 

Video Viral! The brawl occurred between two advocates; Report to the police | व्हिडीओ वायरल! वकिलांमध्ये बेदम हाणामारी; पोलिसात तक्रार   

व्हिडीओ वायरल! वकिलांमध्ये बेदम हाणामारी; पोलिसात तक्रार   

ठळक मुद्देपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन महिलांमध्ये हा वाद झाला होता. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे. 

मध्य प्रदेश -  दोन महिला आणि वकिलांमधील हाणामारीचा एका व्हिडीओ सध्या वायरल होत आहे. हा व्हिडीओत एका पुरुषाने दोन महिलांना बेदम मारहाण केली आहे. व्हिडिओमध्ये एक पुरुष महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे. मध्य प्रदेशातील सतना येथे ही घटना घडली आहे. 
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन महिलांमध्ये हा वाद झाला होता. नोटरी करणारा वकील आणि स्थानिक यांच्यात वादंग निर्माण झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे हाणामारीत पर्यावसन झालं. पुरुषाने महिलेला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. या व्हिडिओत दोन महिला सुरुवातीला बोलत असल्याचे दिसून येत आहेत. त्यानंतरक महिलेच्या मागून तिला कोणीतरी मारताना आणि नंतर एक पुरुष बेदम मारहाण करताना दिसत आहे. या पुरुषाने ३ ते ४ वेळा महिलेच्या कानाखाली लगावल्या त्यानंतर धक्काबुक्की केली. भांडण सोडवण्याऐवजी ते पेटलं. महिलेला लाथाबुक्क्या मारहाण करण्यात आली. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. 

 

 

Web Title: Video Viral! The brawl occurred between two advocates; Report to the police