Video : शिवसेना नगरसेवकाची दादागिरी; बेल्ट आणि लोखंडी रॉडने तरुणाला केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 20:36 IST2021-05-26T20:33:33+5:302021-05-26T20:36:14+5:30
Shivsena Corporator Assaulting to Youth in Ambernath : शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Video : शिवसेना नगरसेवकाची दादागिरी; बेल्ट आणि लोखंडी रॉडने तरुणाला केली मारहाण
अंबरनाथ : अंबरनाथमध्येशिवसेना नगरसेवकाने एका तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक आकाशने रवीला 'तू बाहेर का फिरतो आहेस' असे बोलून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने आपल्या कमरेला असलेला बेल्ट काढून रवीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच लोखंडी रॉडने देखील मारहाण करण्यात आली.
उल्हासनगरच्याशिवसेना नगरसेवकाची तरुणाला बेदम मारहाण pic.twitter.com/4gt5lE5jpB
— Lokmat (@MiLOKMAT) May 26, 2021
आकाश परशुराम पाटील असे शिवसेनेच्या नगरसेवकाचे नाव असून ते जुन्या अंबरनाथ गावात वास्तव्याला आहे आहेत. याच भागात राहणाऱ्या रवी जयसिंघानी याच्यासोबत आकाश पाटील यांचे जुने वाद होते. त्यातूनच २५ मे रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास रवी हा धर्माजी पाटील चाळ परिसरात फिरत असताना आकाश पाटील यांनी तिथे येऊन रवी याला मारहाण केली. या घटनेनंतर रवी याने एक व्हिडिओ तयार केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मारहाणीचा प्रकार समोर आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आकाश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत तरुणाच्या संपूर्ण शरीरावर काळे निळे डाग पडले आहेत. जुन्या भांडणाचा राग मनात धरून या तरुणाला मारहाण करण्यात आली आहे.