भयंकर! सीट बेल्ट न लावल्याने अडवलं; चालकाने पोलिसालाच बोनेटवरून नेलं; थरकाप उडवणारा Video 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 02:53 PM2022-06-20T14:53:25+5:302022-06-20T14:55:39+5:30

Video - सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही धक्कादायक घटना कैद झाली आहे. कारचालक गजेंद्र सालेचा याच्याविरुद्ध कार्यालयीन कामात अडथळा आणण्यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Video policeman hanging on bonnet of car to get traffic rules to be followed shocking incident in jodhpur | भयंकर! सीट बेल्ट न लावल्याने अडवलं; चालकाने पोलिसालाच बोनेटवरून नेलं; थरकाप उडवणारा Video 

भयंकर! सीट बेल्ट न लावल्याने अडवलं; चालकाने पोलिसालाच बोनेटवरून नेलं; थरकाप उडवणारा Video 

Next

नवी दिल्ली - सूर्यनगरी जोधपूरमध्ये वाहतुकीच्या नियमांचं पालन करून घेणं एका पोलीस कर्मचाऱ्यालाच महागात पडलं आहे. एका ड्रायव्हरने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत गाडी पळवली. यामुळे पोलीस कर्मचारी गाडीच्या बोनेटवर पडला. मात्र तरीही चालक थांबला नाही आणि सुमारे 500 मीटर अंतरापर्यंत गाडी चालवत राहिला. त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या दोन जणांनी आपली बाईक समोर लावून कार थांबवली आणि पोलीस कर्मचाऱ्याचा जीव वाचला.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही धक्कादायक घटना कैद झाली आहे. कारचालक गजेंद्र सालेचा याच्याविरुद्ध कार्यालयीन कामात अडथळा आणण्यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरच्या देवनगर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. रविवारी पाल लिंक रोडवर असलेल्या शाळेसमोर वाहतूक पोलीस हवालदार गोपाल विश्नोई ड्युटीवर होते. इतक्यात समोरून एक कार आली. कार चालकाने सीट बेल्ट लावला नव्हता. यावर  गोपाल विश्नोई यांनी त्याला थांबण्याचा इशारा केला.

गाडीचा चालक गजेंद्र सालेचा या तरुणाने आधी गाडी थांबवली आणि पोलीस शिपाई गोपाल विश्नोई यांच्याशी वाद घातला. नंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात गाडीच्या समोर उभा गोपाल विश्नोई यांना धडक लागली आणि ते गाडीच्या बोनेटवर पडले. हे सर्व पाहूनही त्या तरुणाने लक्ष दिलं नाही आणि गाडी चालवतच राहिला. हे पाहून पोलिसाने गाडीचा वायपर पकडत बोनेटवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला. तरीही चालक पर्वा न करता गाडी पुढे चालवत राहिला.

याच दरम्यान तिथून जाणाऱ्या दोन जणांनी त्यांची बाईक कारसमोर लावून कार अडवली. त्यानंतर चालकाने गाडी थांबवली. मग गोपाल विश्नोई हे बोनेटवरून खाली उतरले आणि त्यांच्या जीवात जीव आला. घटनेनंतर देवनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी जयकिशन यांनी घटनास्थळ गाठून कारचालक गजेंद्र सालेचा याच्याविरुद्ध कार्यालयीन कामात अडथळा आणण्यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला. याआधी देखील अशा घटना घडल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Video policeman hanging on bonnet of car to get traffic rules to be followed shocking incident in jodhpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.