Video : विरारच्या खानिवडे बंदरात वाळू माफियांवर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 20:57 IST2018-11-30T20:55:07+5:302018-11-30T20:57:05+5:30
पहाटे केलेल्या कारावईत पोलिसांनी खानिवडे बंदरातून बेकायदेशीररित्या जप्त केलेली २८ लाख रुपयांची साडेपाचशे बास वाळू जप्त केली.

Video : विरारच्या खानिवडे बंदरात वाळू माफियांवर पोलिसांची कारवाई
वसई - वसईच्या रेती बंदरात बेकायदेसीर वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी पुन्हा मोहीम उघडली आहे. पहाटे केलेल्या कारावईत पोलिसांनी खानिवडे बंदरातून बेकायदेशीररित्या जप्त केलेली २८ लाख रुपयांची साडेपाचशे बास वाळू जप्त केली.
विरारनजीक खानिवडे आणि हेदववडे बंदरात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याची माहिती विरार पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा घातला असता वाळू माफिया वाळू उपसा करत असताना आढळले. पोलीस आल्याची माहिती मिळताच वाळू माफिया पसार झाले. यावेळी पोलिसांनी २८ लाख रुपये किंमतीच ५७२ ब्रास वाळू जप्त केली. पळून जाणाऱ्या वाळू माफियांचा पाठलाग सुरू केला असता हेदवड खानिवडे रस्त्यावर एक वाळू माफिया ट्रक सोडून फरार झाला.
पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात वाळू माफियांवर भा. दं. सं. कलम ३७९, ३४ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १५, १९ जमीन महसूल अधिनियमन ४८ (७)(८) सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधात्मक अधिनयमन कलम ३ अंतर्गत गु्न्हा दाखल केल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनश्याम आढाव यांनी दिली.