Video : लोकलसमोर उडी मारून संपवले जीवन, सीसीटीव्हीत कैद झाली आत्महत्येची घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 18:56 IST2018-10-29T18:54:29+5:302018-10-29T18:56:28+5:30
आज सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून ही आत्महत्येची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मृत व्यक्तीचे नाव भारत जैन (वय ४०) असे आहे.

Video : लोकलसमोर उडी मारून संपवले जीवन, सीसीटीव्हीत कैद झाली आत्महत्येची घटना
मुंबई - मध्य रेल्वेच्या भायखळारेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर प्रवाशाने धावत्या लोकलसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे. आज सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून ही आत्महत्येची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेदरम्यान प्लॅटफॉर्म तशी प्रवाश्यांची गर्दी देखील नसल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. मृत व्यक्तीचे नाव भारत जैन (वय ४०) असे आहे. कामाठीपुरा गल्ली क्रमांक १ मध्ये राहणाऱ्या भारत यांनी नेमकं कशामुळे आत्महत्या केली याचा रेल्वे पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलीस ठाण्यात अपमृत्युची नोंद करण्यात आली आहे. मृत भारतचा स्टीलचा व्यवसाय होता असल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.