VIDEO : बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत परिवाराला लुटलं, कॅमेरात कैद झाली धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 15:56 IST2021-07-08T15:46:49+5:302021-07-08T15:56:43+5:30
पोलिसांच्या हाती अजून काहीच लागलं नसून ते तपास करत आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतं की, कशाप्रकारे चोरांनी घरात चोरी केली.

VIDEO : बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत परिवाराला लुटलं, कॅमेरात कैद झाली धक्कादायक घटना
दिल्लीच्या (Delhi) उत्तमनगर भागात एका फ्लॅटमध्ये दिवसाढवळ्या काही चोरांनी वीज कर्मचारी असल्याचं सांगत दरोडा (Family looted) टाकला. बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत घरातील लोकांनी त्यांनी बांधून ठेवलं आणि चोरी करून फरार झाले. ही धक्कादायक घटना घरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. पोलिसांच्या हाती अजून काहीच लागलं नसून ते तपास करत आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतं की, कशाप्रकारे चोरांनी घरात चोरी केली.
या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे चार ते पाच चोर घरात खोटं सांगून शिरतात. यावेळी घरातील पुरूष हॉलमध्ये बसला आहे तर महिलेने दरवाजा उघडला. यावेळी त्यांची लहान मुलगीही हॉलमध्ये खेळत आहे. चोरांनी लगेच बंदुकीचा धाक दाखवत महिला आणि पुरूषाला शांत राहण्यास सांगितलं. तर एका व्यक्तीने पुरूषाचे हात बांधून त्याला खाली पाडलं आहे. तर काही चोर आतल्या रूममध्ये गेले आहेत.
दिल्ली के उत्तम नगर इलाके में आज एक फ्लैट में दिन दहाड़े बदमाश खुद को बिजली वाला बताकर दाखिल हुए, बंदूक और चाकू की नोक पर घर वालो को बंधक बनाकर घर मे लूटपाट की और फरार हो गए। लाईव डकैती की तस्वीरें डराने वाली है। पुलिस के हाथ खाली है। @indiatvnewspic.twitter.com/gwn9ejI1fN
— Abhay parashar (@abhayparashar) July 7, 2021
या चोरांनी या घरातून किती माल लंपास केला याची माहिती मिळू शकलेली नाही. तसेच याप्रकरणी पोलिसांनाही काहीच धागेदोरे हाती लागलेले नाहीत. अभय परशर नावाच्या व्यक्तीने दरोड्याचा हा धक्कादायक व्हिडीओ त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यानेच पोलिसांच्या हाती काहीच लागलं नसल्याचं लिहिलं आहे.