Video : कुत्र्यानं केली घाण, शेजाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 13:09 IST2021-07-16T13:08:53+5:302021-07-16T13:09:19+5:30

Beating among neighbours : ही फ्री स्टाईल हाणामारी मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Video: Dirt done by a dog, freestyle beating among neighbors | Video : कुत्र्यानं केली घाण, शेजाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल मारहाण

Video : कुत्र्यानं केली घाण, शेजाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल मारहाण

ठळक मुद्देइमारतीत राहणाऱ्या एका महिलेच्या कुत्र्याने इमारतीच्या एका मजल्यावर घाण केली.

डोंबिवलीः  येथील पूर्वेकडील देसले पाडा परिसरातील साई इन्कलेव्ह या सोसायटीमध्ये बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोन शेजाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. ही फ्री स्टाईल हाणामारी मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

इमारतीत राहणाऱ्या एका महिलेच्या कुत्र्याने इमारतीच्या एका मजल्यावर घाण केली. दुसऱ्या एका महिलेने या मुद्द्यावर त्या महिलेशी वाद घातला. ज्या महिलेचा कुत्रा होता तिने साफसफाई केली नंतर हा वाद वाढला आणि त्यातून हा हाणामारीचा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात दोन्ही बाजूकडील एकूण १४ ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक केल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली.

 

 

Web Title: Video: Dirt done by a dog, freestyle beating among neighbors