अवैध्यरित्या रेती उत्तखन करून बोटीने वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची धाड 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 07:47 PM2019-12-16T19:47:40+5:302019-12-16T19:52:46+5:30

वसई पोलिसात 15 जणांवर गुन्हा दाखल ; 13 जण अटकेत तर 2  फरार  

Vasai police raid on boat transporters by illegally digging sand | अवैध्यरित्या रेती उत्तखन करून बोटीने वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची धाड 

अवैध्यरित्या रेती उत्तखन करून बोटीने वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची धाड 

Next
ठळक मुद्देदोन बोटी, 5 ब्रास रेती सहित 8 लाख 14  हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त या कारवाईत पंधरा पैकी 13  जणांना  अटक करण्यात आल्याची माहिती वसई पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांनी लोकमत ला दिली.

आशिष राणे 
वसई - येथील वसई पोलीस ठाणे यांचे हद्दीत किल्लाबंदर समुद्रात विनापरवाना अवैध्यरित्या रेतीची बोटीच्या सहाय्याने वाहतूक करणाऱ्या १५ जणांवर वसई पोलिसांनीधाड टाकल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली आहे.

या कारवाईत वसई पोलिसांनी समुद्रातील विना नंबरच्या दोन बोटीसहित पाच ब्रास रेती आदी साहित्य असा तब्बल आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून या दोषींवर वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पंधरा पैकी 13  जणांना  अटक करण्यात आल्याची माहिती वसई पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांनी लोकमतला दिली.

सविस्तर माहितीनुसार, वसई पोलीस ठाणे हद्दीतील किल्लाबंदर जेट्टीच्या बाजूला असलेल्या समुद्रात रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास पंधरा जणांच्या चमूने बारीबारीने बोटीवरील नांगर पाण्यात उभा करून लाकडी बाबूंच्या पुढे बादली लावून डुबी पद्धतीने विनापरवानगी पाच ब्रास रेती काढून तिची दोन बीटी च्या साहाय्याने अवैध्य वाहतूक करीत असल्याची माहिती समजल्यावर लागलीच वसई वसई पोलिसांच्या टीमनं याठिकाणी किल्लाबंदर जेटीवर धाडी टाकून या 15 आरोपीपैकी 13 आरोपींना बोटीं व रेतीसाठ्या सहित ताब्यात घेतले मात्र त्यावेळी दोघेजण अंधाराचा फायदा घेत तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले.

अटक आरोपींची नावे
1) रोमिया दोनी मालिया, 2) संतोष उपाध्या, 3) मोनेरुल सुखचंद शेख, 4) अफजहुसेन लोकिमोदींन मुङोल, 5) रफिक अकबर शेख, 6) आलमगीर शमशुद्दीन मंडळ, 7) मिस्टर मियाकम मंडळ, 8) सेंटू हमीदुल मंडळ, 9) आझाद सुखचंद शेख,10) राजोफली रमजानअली मंडोल,11) जोहदिन रजाबुल शेख, 12) रमजान अली मुफासाआली शेख,13) समेरुल मोहरम शेख,14) मोरसलीम जशरुद्दीन सरकार, आणि 15) इमाजदुद्दिन समशुद्दीन शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
 

" रविवारी संध्याकाळी उशिरा किल्लाबंदर जेट्टी ठिकाणी अवैध्य रेती चोरी व तिची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच धाड टाकली असता त्याठिकाणहून दोन बोटी,5 ब्रास रेतीसाठा व इतर साहित्य यांच्यासह एकूण 15 आरोपी जागेवर होते. मात्र, धरपकडीत 15 पैकी 13 जण आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली. या कारवाईत दोघेजण फरार झाले. त्यांचा शोध सुरु आहे. या अटकेतील 13 आरोपींना सोमवारी वसई कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे." - भास्कर पुकळे, पोलीस निरीक्षक, वसई पोलीस ठाणे 

Web Title: Vasai police raid on boat transporters by illegally digging sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.