बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून अल्पवयीन भावाकडून ८ ते १० वाहनांंची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 10:40 IST2020-10-28T10:36:03+5:302020-10-28T10:40:04+5:30

एका अल्पवयीन आरोपीसह दोघे ताब्यात, दहशत पसरवण्याचा प्रयत्न

Vandalism of vehicles by mob in Chinchwad; Trying to spread panic | बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून अल्पवयीन भावाकडून ८ ते १० वाहनांंची तोडफोड

बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून अल्पवयीन भावाकडून ८ ते १० वाहनांंची तोडफोड

पिंपरी : टोळक्याने आठ ते  दहा वाहनांची तोडफोड केली. चिंचवड येथील वेताळ नगर येथे मंगळवारी (दि. २७) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह दोघांना ताब्यात घेतले आहे.

आण्णा ऊर्फ ओंकार हजारे, ओंकार कसबे, मल्हारी दभडगे, आदित्य फाळके, लखन डोंगरे व इतर दोन ते तीनजण, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. स्वानंद चंद्रकांत कांबळे (वय २०, रा. वेताळनगर, चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी याच्या नातेवाईक तरुणीने तिच्या प्रियकरासोबत मंगळवारी लग्न केले. त्या रागातून आरोपी यांनी हातात तलवारी, कोयते घेऊन तसेच दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. कोयत्याने रिक्षा व तीनचाकी मिनी टेम्पो फोडून नुकसान केले. तसेच लाथा मारून दुचाकी पाडून वाहनांचे नुकसान केले. लोकांमध्ये दहशत पसरविण्याच्या उद्देशाने तलवार व कोणते हवेत भिरकावले. येथून निघून जा, नाहीतर तुमची सुट्टी नाही, असे म्हणून तलवार हवेत गोल गोल फिरवून मोठमोठ्याने ओरडून लोकांच्या मनात दहशत निर्माण केली.

Web Title: Vandalism of vehicles by mob in Chinchwad; Trying to spread panic

टॅग्स :Policeपोलिस