शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

गाझियाबादमध्ये विचित्र घटना; बदला घेण्यासाठी गर्भवती म्हशीवर केले चाकूने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 00:30 IST

शुक्रवारी जेव्हा प्रमोद आपल्या म्हशीला चारा टाकण्यासाठी  गेले, तेव्हा त्यांना त्यांची म्हैस रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. ती अक्षरशः तडफडत होती.

उत्तर प्रदेशातील गाझीबादच्या मुरादनगरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे बदला घेण्याच्या उद्देशाने एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या म्हशीवर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. आरोपीने ज्या म्हशीवर हल्ला केला, ती म्हैस गर्भवती होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक केली आहे.

ही घटना गाझियाबादमधील मुरादनगर भागातील रावली कला गावातील आहे. येथे प्रमोद कुमार आपल्या कुटुंबासह राहतात. ते शेती आणि पशुपालन करून आपला घरखर्च चालवतात. दोन दिवसांपूर्वी त्यांची म्हैस चरणजित सिंग यांच्या घरात बांधलेली होती. शुक्रवारी जेव्हा प्रमोद आपल्या म्हशीला चारा टाकण्यासाठी  गेले, तेव्हा त्यांना त्यांची म्हैस रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. ती अक्षरशः तडफडत होती.

गर्भवती होती जखमी म्हैस -या गर्भवती म्हशीच्या पोटात अनेक वार करण्यात आले होते. प्रमोद कुमार यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर, पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून तपासाला सुरूवात केली. यात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना दीपक कुमार नावाची व्यक्ती त्या वेळेत म्हशीजवळ जाताना दिसली. 

बदला घेण्यासाठी केले कृत्य -  पोलिसांनी दीपकला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आठवडाभरापूर्वी प्रमोदसोबत भांडण झाले होते. यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी आपण म्हशीवर चाकूने वार केल्याचे दीपकने पोलिसांना सांगितले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFarmerशेतकरी