शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीवर पतीने उकळते पाणी ओतले; 'या' विकृत घटनेमागे आहे धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 15:05 IST

Uttar Pradesh man pours boiling water on wife : या धक्कादायक घटनेत, एका ३२ वर्षीय महिलेने मुलाला जन्म न दिल्याबद्दल तिच्या पतीने तिच्यावर उकळते पाणी ओतले तेव्हा तिच्या अंगाची लाहीलाही झाली.

ठळक मुद्देही घटना गेल्या आठवड्यात घडली होती, परंतु पीडित संजूच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर बुधवारी पती सत्यपालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शाहजहांपूर - उत्तरप्रदेशातील शाहजहांपूर येथे एक अतिशय धक्कादायक, निर्दयी घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने माणुसकीची, क्रूरतेची मर्यादाच ओलांडली. या धक्कादायक घटनेत, एका ३२ वर्षीय महिलेने मुलाला जन्म न दिल्याबद्दल तिच्या पतीने तिच्यावर उकळते पाणी ओतले तेव्हा तिच्या अंगाची लाहीलाही झाली.

ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती, परंतु पीडित संजूच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर बुधवारी पती सत्यपालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक (ग्रामीण) संजीव बाजपेयी म्हणाले की, आरोपी फरार असून त्याला लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पीडित महिलेच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, सत्यपाल तिच्यावर तिच्या पालकांकडून ५० हजार आणण्यासाठी दबाव आणत होता. या जोडप्याने 2013 मध्ये लग्न केले होते आणि त्यांना तीन मुली आहेत. सर्वात लहान मुलीचा जन्म गेल्या वर्षी झाला होता. या महिलेवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलगा होत नसल्याने आरोपी सत्यपालचा पत्नीवर राग होता. महिलेला माहेरहून 50 हजार रुपये आणण्यासाठी दबावही आणत होता. तो पत्नीला नेहमी त्रास द्यायचा, तिला जेवणही दिलं जात नव्हतं.

पीडित महिलेच्या वडिलांनी त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. लवकरच त्याला ताब्यात घेतलं जाऊन योग्य ती कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसWaterपाणी