शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

Video - संतापजनक! तरुणाला 'जात' विचारत बेदम मारहाण, गुप्तांगावरही केला हल्ला; घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 14:19 IST

Crime News : माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एक तरुणाला तुझी जात कोणती हा प्रश्न विचारत बेदम मारहाण करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान एक संतापजनक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एक तरुणाला तुझी जात कोणती हा प्रश्न विचारत बेदम मारहाण करण्यात आली आहे. भयंकर बाब म्हणजे तरुणाच्या गुप्तांगावर देखील हल्ला करण्यात आला आहे. सोशल मीडियावर य़ा घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये तरुणाला लोकांनी लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून संतापाची लाट निर्माण झाली आहे. 

बेदम मारहाणीत तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. उपचारासाठी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपी तरुणाला त्याची जात विचारत आहेत. यानंतर आरोपींनी तरुणाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली हे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. 

दोन दिवसांपूर्वी कानपूर देहातमधील अकबर पूर ठाण्याच्या क्षेत्रातील आगूकमालपूर गावात ही भयंकर घटना घडली आहे. प्रेमप्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण झाल्याचं म्हटलं जात आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओ व्हायरल झाल्याचं समजताच याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये तरुणाला मारहाण करताना दिसणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच व्हिडीओमध्ये आणखी दोन लोक त्याला मारहाण करताना दिसत आहेत. त्यांची ओळख पटवून अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी पोलिसांच्या टीम बनवण्यात आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

विकृतीचा कळस! तरुणीचं अपहरण करून 7 जणांनी केला सामूहिक बलात्कार, नराधमांनी तिला रस्त्यावर फेकलं अन्...

राजस्थानच्या अलवरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका 19 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर सात लोकांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भयंकर बाब म्हणजे नराधमांनी मुलीला बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून दिलं आणि ते फरार झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर जबाब नोंदविला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस