शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेश हादरले! बड्या अधिकाऱ्याच्या घरात दुहेरी हत्याकांड; पत्नी, मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 18:35 IST

Lucknow Double Murder: धक्कादायक बाब म्हणजे गोतमपल्ली परिसर हा शहरातील व्हीआयपी भाग आहे. याठिकाणी मंत्री, मुख्यमंत्री, मोठमोठे सरकारी अधिकारी राहतात. मुख्यमंत्री निवासस्थान आणि राजभवनही 100 मीटरवर आहे. यामुळे येथे पावलापावलावर पोलीस तैनात असतात.

गुन्हेगारी घटनांमुळे उत्तर प्रदेश हादरले आहे. आज राजधानी लखनऊच्या पॉश भागातील (Lucknow Double Murder) रेल्वेच्या एका मोठ्या अधिकाऱ्याच्या घरात डबल मर्डर झाल्याने खळबळ उडाली आहे. धक्कदायाक म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली आहे. 

Covishield: कोरोना लस! आता ऑक्सफर्डच्या घोषणेकडेच ब्रिटनचे लक्ष; थेट कायद्यात बदल करणार

रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी (आयआरटीएस) आरडी बाजपेयी (RD Bajpai) यांच्या निवासस्थानी गुन्हेगारांनी घुसून त्यांची पत्नी आणि मुलाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. तर त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. यामुळे लखनऊमध्ये खळबळ उडाली असून बंगल्याच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. लखनऊचे डीजीपी हितेश चंद्र अवस्थीदेखील घटनास्थळी पाहणी करत आहेत. 

तत्पूर्वी पोलीस आयुक्त सुजीत पांडे हे घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी रेल्वेच्या गौतमपल्ली कॉलनीमध्ये वरिष्ठ अधिकारी आरडी बाजपेयी यांच्या पत्नीचा व मुलाचा मृतदेह सापडला आहे. दोघांनाही गोळी मारण्यात आली आहे. पाहणीवेळी ही दरोड्याची घटना दिसत नाहीय. पोलीस तपास करत आहेत. 

अमित शहा ठणठणीत; लवकरच एम्समधून डिस्चार्ज देणार

धक्कादायक बाब म्हणजे गोतमपल्ली परिसर हा शहरातील व्हीआयपी भाग आहे. याठिकाणी मंत्री, मुख्यमंत्री, मोठमोठे सरकारी अधिकारी राहतात. मुख्यमंत्री निवासस्थान आणि राजभवनही 100 मीटरवर आहे. यामुळे येथे पावलापावलावर पोलीस तैनात असतात. एवढी सुरक्षा असताना या भागात दुहेरी हत्याकांड ते देखील बंदुकीच्या गोळ्या झाडून केल्याने खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वीच वाराणसीमध्ये दुहेरी हत्याकांड झाले होते. 

धक्कादायक! दिल्लीला जाणाऱ्या डबल डेकर बसमध्ये महिलेवर बलात्कार; सोबत 44 प्रवासी

Wuhan: शाळा-किंडरगार्टन उघडणार; जीवघेण्या कोरोनाच्या जन्मस्थानी तयारी सुरु

टॅग्स :Murderखूनrailwayरेल्वेUttar Pradeshउत्तर प्रदेश