Wuhan: शाळा-किंडरगार्टन उघडणार; जीवघेण्या कोरोनाच्या जन्मस्थानी तयारी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 06:00 PM2020-08-29T18:00:44+5:302020-08-29T18:03:38+5:30

ऑनलाईन शिक्षण सोडून पुन्हा शाळेत शिक्षण सुरु करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत आणि शाळेबाहेरही मास्क वापरावे आणि शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Wuhan: School-Kindergarten to open; Preparations begin at birthplace of corona | Wuhan: शाळा-किंडरगार्टन उघडणार; जीवघेण्या कोरोनाच्या जन्मस्थानी तयारी सुरु

Wuhan: शाळा-किंडरगार्टन उघडणार; जीवघेण्या कोरोनाच्या जन्मस्थानी तयारी सुरु

Next

जगाला कोरोनाच्या खाईत ढकलणाऱ्या चीनच्या वुहान शहरामध्ये बऱ्याच कालावधीनंतर शाळा-कॉलेज सुरु करण्याची तयारी सुरु झाली आहे. वुहानमधील जवळपास 2,842 शैक्षणिक संस्थांमधील जवळपास 1.4 दशलक्ष विद्यार्थी पुन्हा शाळेत दिसणार आहेत. महत्वाचे म्हणजे वुहान विद्यापीठ सोमवारपासून सुरु झाले आहे. 


किंडर गार्टन, शाळा खोलण्याबाबत शुक्रवारी वुहानमधील प्रशासनाने घोषणा केली. ऑनलाईन शिक्षण सोडून पुन्हा शाळेत शिक्षण सुरु करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत आणि शाळेबाहेरही मास्क वापरावे आणि शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Covishield: कोरोना लस! आता ऑक्सफर्डच्या घोषणेकडेच ब्रिटनचे लक्ष; थेट कायद्यात बदल करणार

याशिवाय शाळांना रोग नियंत्रक उपकरणांचा साठा करण्यास आणि नवीन संक्रमण रोखण्याच्या तयारीला मदत करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. याशिवाय शिक्षक, विद्यार्थ्यांना अनावश्यक समारंभांना हजेरी लावण्यावरही मनाई करण्यात आली आहे. तसेच आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांचा दैनिक अहवाल देण्यासही सांगण्यात आले आहे. याशिवाय़ ज्या परदेशी विद्यार्थ्यांना शाळांनी हजर राहण्याची नोटीस पाठविलेली नाही, त्यांना परत येण्याची परवानगी देण्यात येणार नाही. 

अमित शहा ठणठणीत; लवकरच एम्समधून डिस्चार्ज देणार


कोरोना या महाभयंकर व्हायरसचा जन्म या वुहान शहरात झाला आहे. जानेवारीमध्ये वुहान शहर दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी बंद करण्यात आले होते. चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 80 टक्के मृत्यू हे वुहानमध्ये झालेले आहेत. वुहानमध्ये 3,869 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

धक्कादायक! दिल्लीला जाणाऱ्या डबल डेकर बसमध्ये महिलेवर बलात्कार; सोबत 44 प्रवासी

Web Title: Wuhan: School-Kindergarten to open; Preparations begin at birthplace of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.