धक्कादायक! दिल्लीला जाणाऱ्या डबल डेकर बसमध्ये महिलेवर बलात्कार; सोबत 44 प्रवासी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 04:35 PM2020-08-29T16:35:48+5:302020-08-29T16:36:22+5:30

पीडित महिला ही दिल्लीची राहणारी आहे. ती डबल डेकर बसमधून लखनऊहून दिल्लीला जात होती. महिलेने पोलिसांच्या 112 नंबरवर फोन करून याची तक्रार दिली आहे.

Woman raped in double decker bus bound for Delhi; 44 passengers also travelling | धक्कादायक! दिल्लीला जाणाऱ्या डबल डेकर बसमध्ये महिलेवर बलात्कार; सोबत 44 प्रवासी

धक्कादायक! दिल्लीला जाणाऱ्या डबल डेकर बसमध्ये महिलेवर बलात्कार; सोबत 44 प्रवासी

Next

उत्तर प्रदेश ही अत्याचार, गुन्हेगारांची राजधानी बनत चालली आहे. लखनऊहून दिल्लीला निघालेल्या डबल डेकर लक्झरी बसमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मथुराच्या मांट भागातील आहे. महिलेवर बसच्या कंडक्टरनेच बलात्कार केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कंडक्टरला अटक केली आहे. 


पीडित महिला ही दिल्लीची राहणारी आहे. ती डबल डेकर बसमधून लखनऊहून दिल्लीला जात होती. चालत्या बसमध्येच कंडक्टरने महिलेवर अत्याचार केला. ही घटना पहाटे 5 च्या सुमारास घडल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. महिलेने पोलिसांच्या 112 नंबरवर फोन करून याची तक्रार दिली आहे. यानंतर लगेचच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. 


या प्रकरणी एसपी देहात श्रीचंद यांनी सांगितले की, एका महिलेसोबत चालत्या बसमध्ये दुष्कर्म केल्याचे प्रकरण समोर आले आहे. गुन्हा दाखल करून कारवाई सुरु आहे. 29 ऑगस्टला 112 नंबरवर एका महिलेने बलात्कार झाल्याची तक्रार दिली. महिलेने बसचा नंबर AR 01 L 1052 असल्याचे सांगितले. यामुळे आरोपीला लवकरात लवकर पकडता आले. 


जेव्हा बसमधील प्रवाशांसोबत पोलिसांनी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, मांट टोलवर जेव्हा बस थांबली होती. तेव्हा महिलेने हेल्परला मारहाण करण्यास सुरुवात केली. या बसमध्ये जवळपास 40 जण प्रवास करत होते. जेव्हा या महिलेने त्यांना बलात्कार झाल्याचे सांगितले तेव्हा या प्रवाशांना धक्का बसला. 
 

Web Title: Woman raped in double decker bus bound for Delhi; 44 passengers also travelling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.